IPL 2024 आधी तिसऱ्या संघाने Head Coach बदलला, दिग्गज खेळडूची नियुक्ती

New Head Coach IPL 2024 : आरसीबी संघाच्या हेच कोचपदी अँडी फ्लॉवर यांची नियुक्ती करण्यात आली होती. संजय बांगर यांना नारळ देत आरसीबीने फ्लॉवर यांच्याकडे जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला होता. अशातच आता आणखी एका संघाने हेड कोच बदलला आहे.

IPL 2024 आधी तिसऱ्या संघाने Head Coach बदलला, दिग्गज खेळडूची नियुक्ती
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 4:46 PM

मुंबई : आयपीएलच्या 17 हंगामाला अनेक महिने बाकी आहेत. मात्र त्याआधी सर्व संघ आतापासून तयारीला लागलेले दिसत आहेत. संघबांधणी करण्यासाठी फ्रँचायझी थेट आता हेड कोच बदलत असलेलं पाहायला मिळालं आहे. (New Head Coach SRH 2023) आताच आरसीबी संघाच्या हेच कोचपदी अँडी फ्लॉवर यांची नियुक्ती करण्यात आली होती. संजय बांगर यांना नारळ देत आरसीबीने फ्लॉवर यांच्याकडे जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला होता. अशातच आता आणखी एका संघाने हेड कोचपदी न्यूझीलंड संघाच्या दिग्गज खेळाडूची नियुक्ती करण्यात आली आहे.

‘या’ संघाच्या हेड कोचपदी निवड!

डॅनिअल व्हिक्टोरी याची सनराईजर्स हैदराबाद संघाच्या हेड कोचपदी निवड करण्यात आली आहे. आता डॅनिअल व्हिक्टोरी याच्याकडे ‘द हंड्रेड’ लीगमधील बर्मिंगहॅम फिनिक्स संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. आयपीएलमध्ये आरसीबी संघाचा हेड कोच असताना संघाने 2015 साली प्ले-ऑफ आणि 2016 साली फायनलपर्यंत एन्ट्री मारली होती.

2024 च्या सीझनआधी हेड कोच बदलणारा सनराईजर्स हैदराबाद हा तिसरा संघ ठरला आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघाने अँडी फ्लॉवर यांच्या जागी जस्टिन लँगर यांची हेड कोचपदी निवड केली होती. त्यानंतर आरसीबीने संजय बांगर यांच्या जागी अँडी फ्लॉवर आणि आता सनराईजर्स हैदराबाद संघाने ब्रायन लारा याच्या जागी डॅनिअल व्हिक्टोरीची निवड केली आहे.

दरम्यान, सनराईजर्स संघाच्या कर्णधारपदाची धुरा दक्षिण आफ्रिकेचा मार्करम सांभाळत आहे. 2016 साली हैदराबाद संघाने विजेतेपदावर नाव कोरलं होतं. आरसीबी संघावर तेव्हा 8 धावांनी विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर हैदराबाद संघाला काही दमदार कामगिरी करता आली नाही. 2023 मध्ये सनरायझर्स संघाने 14 पैकी 10 सामने गमावले होते.  त्यामुळे फ्रँचायझींनी थेट हेड कोच याची बदलण्याचा निर्णय घेतला असावा.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.