Irani Trophy : 8 इनिंगमध्ये 556 धावा फटकावूनही मुंबईचा खेळाडू बाहेर, इराणी कपसाठी टीम जाहीर

Irani Trophy : या 16 खेळाडूंमध्ये एका प्लेयरच नाव नाहीय, ज्याच्या सिलेक्शनची भरपूर अपेक्षा होती. ज्या प्लेयरला संधी मिळालेली नाही, त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केलीय.

Irani Trophy : 8 इनिंगमध्ये 556 धावा फटकावूनही मुंबईचा खेळाडू बाहेर, इराणी कपसाठी टीम जाहीर
Team announced for irani trophyImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 1:11 PM

Irani Trophy : इराणी कपसाठी रेस्ट ऑफ इंडियाची टीम जाहीर झाली आहे. या टीममध्ये 16 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. मयंक अग्रवालकडे रेस्ट ऑफ इंडियाच नेतृत्व देण्यात आलय. या 16 खेळाडूंमध्ये एका प्लेयरच नाव नाहीय, ज्याच्या सिलेक्शनची भरपूर अपेक्षा होती. ज्या प्लेयरला संधी मिळालेली नाही, त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केलीय. टीम इंडियात त्याची निवड झाली पाहिजे अशी सातत्याने मागणी सुरु होती. या खेळाडूच नाव आहे सर्फराज खान. त्याने रणजी ट्रॉफी 2023 स्पर्धेत 8 इनिंगमध्ये 3 शतकांसह 556 धावा केल्या आहेत.

इराणी ट्रॉफीत कुठल्या दोन टीम्समध्ये सामना?

सर्फराज खानची इराणी कपसाठी निवड का झालेली नाही? ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्याआधी रेस्ट ऑफ इंडियाच्या कार्यक्रमाबद्दल जाणून घ्या. इराणी कपमध्ये रेस्ट ऑफ इंडिया आणि रणजी चॅम्पियन मध्य प्रदेशमध्ये सामना होणार आहे. ग्वालियरच्या रुप सिंह स्टेडियममध्ये हा सामना 1 ते 5 मार्च दरम्यान होणार आहे.

37 सामन्यात 79 पेक्षा जास्त सरासरी

सर्फराज खानने रणजी ट्रॉफी 2023 मध्ये 100 पेक्षा जास्त सरासरीने 556 धावा केल्या आहेत. मागच्या दोन रणजी सीजनमध्ये सर्फराजची 100 पेक्षा जास्त सरासरी आहे. सर्फराजची फर्स्ट क्लासमधील सरासरी पाहिल्यास तो सर डॉन ब्रॅडमननंतर येतो. फक्त 37 फर्स्ट क्लास मॅचचा अनुभव असलेल्या सर्फराजने 79 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत. इतकी जबरदस्त कामगिरी असूनही सर्फराजची रेस्ट ऑफ इंडियामध्ये का निवड होत नाही? हा मुद्दा आहे.

सिलेक्शनसाठी सर्फराज उपलब्ध नव्हता

BCCI ने सर्फराजची निवड का केली नाही? त्याचं कारण सांगितलं. सर्फराज सिलेक्शनसाठी उपलब्ध नव्हता. BCCI नुसार, सर्फराजच्या बोटांमध्ये फ्रॅक्चर आहे. दुखापतीमुळे सर्फराज सिलेक्शनमध्ये सहभागी झाला नाही. त्याच्याजागी इंद्रजीतला टीममध्ये स्थान दिलय. रेस्ट ऑफ इंडिया: मयंक अग्रवाल (कॅप्टन), अभिमन्यु ईश्वरन, यशस्वी जायसवाल, यश ढुल, बाबा इंद्रजीत, उपेन्द्र यादव (विकेटकीपर), अतीत शेठ, सौरभ कुमार, हार्विक देसाई, नवदीप सैनी, मुकेश कुमार, चेतन साकरिया, आकाशदीप, मयंक मार्कण्डेय, पुलकित नारंग, सुदीप कुमार घरामी

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.