IRE vs IND 2nd T20I | आयर्लंडने शेवटपर्यंत झुंजवलं, मात्र टीम इंडियाच विनर, सामन्यासह मालिका जिंकली

Ireland vs India 2nd T20I | टीम इंडियाने आयर्लंड विरुद्ध जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात 2-1 अशा फरकाने मालिका जिंकली आहे.

IRE vs IND 2nd T20I | आयर्लंडने शेवटपर्यंत झुंजवलं, मात्र टीम इंडियाच विनर, सामन्यासह मालिका जिंकली
Follow us
| Updated on: Aug 20, 2023 | 11:20 PM

डब्लिन | टीम इंडियाची बॉलिंग साईड स्ट्राँग असूनही आयर्लंडला दुसऱ्या टी 20 सामन्यात ऑलआऊट करण्यात अपयश आलं. टीम इंडियाने आयर्लंडला विजयासाठी 186 धावांचं आव्हान दिलं. टीम इंडियाच्या गोटात एकसेएक बॉलर आहेत. मात्र टीम इंडियाला आयर्लंडला 20 ओव्हरआधी काही रोखता आलं नाही. आयर्लंडला सामना जिंकता आला नाही, मात्र त्यांनीही शेवटपर्यंत चांगलीच झुंज दिली. आयर्लंडने 186 धावांचा पाठलाग करताना 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 152 धावा केल्या. अशा प्रकारे टीम इंडियाने 33 धावांसह ही मालिकाही 2-1 अशा फरकाने जिंकली. टीम इंडियाचा आयर्लंड विरुद्धचा हा सलग सातवा विजय ठरला.

आयर्लंडकडून एंड्र्यू बालबर्नी याने सर्वाधिक 72 धावांती खेळी केली. कॅप्टन पॉल स्टर्लिंग आणि लॉर्कन टकर दोघेही भोपळाही फोडू शकले नाहीत. हॅरी टकर 7 रन्स करुन माघारी परतला. कर्टिस कॅम्फर याने 18, जॉर्ज डॉकरेल 13 आणि मार्क अडायर याने 23 धावांचं योगदान दिलं. बॅरी मॅककार्थी याने 2 रन करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर क्रेग यंग आणि जोशुआ लिटील नाबाद परतले.

टीम इंडियाकडून कॅप्टन जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोई या तिघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर अर्शदीपने 1 विकेट घेतली.

टीम इंडियाचा आयर्लंड विरुद्ध हॅट्रिक मालिका विजय

दरम्यान टीम इंडियाने या विजयासह आयर्लंड विरुद्ध सलग तिसऱ्यांदा टी 20 मालिका जिंकली आहे. याआधी टीम इंडियाने 2018 मध्ये विराट कोहली आणि त्यानंतर 2022 मध्ये हार्दिक पंड्याच्या कॅप्टन्सीत आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिका जिंकली होती. त्या दोन्ही मालिका 2 सामन्यांच्या होत्या.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | जसप्रीत बुमराह (कॅप्टन) ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई.

आयर्लंड प्लेईंग इलेव्हन | पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, ​​जोशुआ लिटल आणि बेंजामिन व्हाइट.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.