IRE vs IND | आता टीम इंडियाचं मिशन आयर्लंड, जसप्रीत बुमराह सांभाळणार कॅप्टन्सी

Ireland vs India T20i Series | आयर्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील टी 20 मालिकेला शुक्रवार 18 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

IRE vs IND | आता टीम इंडियाचं मिशन आयर्लंड, जसप्रीत बुमराह सांभाळणार कॅप्टन्सी
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 10:08 PM

डब्लिन | रोहित शर्मा याने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला कसोटी आणि वनडे सीरिजमध्ये विजय मिळवून दिला. त्यानंतर 5 सामन्यांच्या मालिकेसाठी हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात टीम इंडिया विंडिज विरुद्ध खेळली. पहिल्या 2 सामन्यात पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाने सलग 2 सामने जिंकत मालिकेत बरोबरी साधली. मात्र पाचव्या आणि अंतिम सामन्यात टीम इंडियाने सामन्यासह मालिका 2-3 फरकाने गमावली. टीम इंडियाने यासह विंडिज विरुद्ध 2016 नंतर पुन्हा टी 20 मालिका गमावली.

टीम इंडियाची युवा ब्रिगेड आता आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. दुखापतीनंतर कमबॅक केलेल्या जसप्रीत बुमराह याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पुणेकर ऋतुराज गायकवाड याच्याकडे उपकर्णधार करण्यात आलं आहे. या मालिकेत टीम इंडियाकडून अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यामध्ये रिंकू सिंह याचं आवर्जून नाव घ्यावं लागेल. तसेच शिवम दुबे, आवेश खान, शाहबाज अहमद, प्रसिद्ध कृष्णा आणि वॉशिंग्टन सुंदर यांचंही कमबॅक झालं आहे.

आयर्लंड विरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेला येत्या 18 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर 23 ऑगस्टला तिसरा आणि शेवटचा सामना पार पडणार आहे. ही मालिका खऱ्या अर्थाने टीम इंडियासाठी महत्वपूर्ण अशी आहे. कारण, या मालिकेतून जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वाचा आणि अनुभवाचा खरा कस लागेल. तसेच दुखापतीनंतर पहिल्यांदाच खेळताना बुमराहला काही त्रास होतोय का, हे स्पष्ट होईल.

तसेच आगामी आशिया कपआधी काही खेळाडूंना संधी द्यायची की नाही, हे या मालिकेतील कामगिरीवरुन स्पष्ट होईल. त्यामुळे आता आयर्लंड विरुद्ध टीम इंडियाची युवा ब्रिगेड कशी कामगिरी करते, याकडे क्रिकेट रसिकांसह निवड समितीची करडी नजर असणार आहे.

टी 20 मालिकेचं वेळापत्रक

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, पहिला सामना, 18 ऑगस्ट.

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, दुसरा सामना, 20 ऑगस्ट.

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, तिसरा सामना, 23 ऑगस्ट.

टी 20 सीरिजसाठी आयर्लंड क्रिकेट टीम | पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वोरकॉम, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.

आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया | जस्प्रीत बुमराह (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड (व्हीसी), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार आणि आवेश खान.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.