Ireland vs India | आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया टी 20 सीरिज कोणत्या चॅनेलवर पाहता येणार?
ireland vs india t20i series live streaming | आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील टी 20 मालिकेतील सर्व सामने टीव्हीवर कुठे पाहता येतील हे जाणून घ्या.
डब्लिन | आशिया कप 2023 आधी टीम इंडिया आयर्लंडला पोहचली आहे. टीम इंडिया या दौऱ्यात आयर्लंड विरुद्ध टी 20 सीरिज खेळणार आहे. या मालिकेसाठी अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर त्याजागी नवख्या खेळाडूंना संधी दिली आहे. तसेच काही खेळाडूंचं टीममध्ये या टी 20 मालिकेच्या निमित्ताने कमबॅकही झालं आहे. एकूण 3 सामन्यांची ही टी 20 सीरिज आहे. टीम इंडियाच्या कॅप्टन्सीची सूत्र ही जसप्रीत बुमराह याला दिली गेली आहे.
मालिकेतील पहिला सामना हा 18 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे. ही वेळ तिन्ही सामन्यांसाठी लागू असणार आहे. ही संपूर्ण मालिका टीव्हीवर कोणत्या चॅनेलवर पाहता येणार हे आपण जाणून घेणार आहोत.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील सामने हे मोबाईल आणि लॅपटॉपवर जिओ सिनेमावर पाहता येईल. तसेच टीव्हीवर हे सामने स्पोर्ट्स 18 वर पाहता येईल.
टी 20 सीरिजचं वेळापत्रक
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, पहिला सामना, 18 ऑगस्ट.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, दुसरा सामना, 20 ऑगस्ट.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, तिसरा सामना, 23 ऑगस्ट.
आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया | जस्प्रीत बुमराह (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड (व्हीसी), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार आणि आवेश खान.
आयर्लंड विरुद्धच्या टी 20 सीरिजआधी टीम इंडियाचा जोरदार सराव पाहा व्हीडिओ
Doublin’ the intensity in Dublin ft. #TeamIndia 😎#IREvIND pic.twitter.com/xcOzf2e0oO
— BCCI (@BCCI) August 16, 2023
टी 20 सीरिजसाठी आयर्लंड क्रिकेट टीम | पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वोरकॉम, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.