IRE vs IND T20I Series | टीम इंडिया विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी आयर्लंड संघ जाहीर
Ireland Squad For T20i Series Against Team india | आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे.
डब्लिन | टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर आयर्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेला 18 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. मालिकेच्या 14 दिवसांआधी आयर्लंड क्रिकेट बोर्डाने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. पॉल स्टर्लिंग हा टीम इंडिया विरुद्ध आयर्लंडचं कर्णधारपद सांभाळणार आहे.
टी 20 मालिकेसाठी आयर्लंड टीम
Ireland have named the squad that will take on the No.1 ranked team in the @MRFWorldwide ICC Men's T20I Team Rankings ?#IREvINDhttps://t.co/FOb0S4KaOi
— ICC (@ICC) August 4, 2023
तर बीसीसीआयने 31 जुलै रोजी आयर्लंड विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा केली होती. या मालिकेतून टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा या दोघांनी कमबॅक केलं. बीसीसीआयने जसप्रीत बुमराह याला पहिल्यांदाच कॅप्टनसीची जबाबदारी दिली. तर ऋतुराज गायकवाड याला उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली.
तसेच या मालिकेत निवड समितीने वरिष्ठांना विश्रांती देत युवा खेळाडूंना अधिकाअधिक संधी दिली आहे. तसेच अनेकांचं कमबॅकही झालंय. यामध्ये आवेश खान, अर्शजीप सिंह, रवि बिश्नोई, शिवम दुबे आणि शाहबाज अहमद यांचा समावेश आहे. तर रिंकू सिंह याचा पहिल्याच परदेश दौरा असणार आहे.
आयर्लंड विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी भारतीय संघ
NEWS ?- @Jaspritbumrah93 to lead #TeamIndia for Ireland T20Is.
Team – Jasprit Bumrah (Capt), Ruturaj Gaikwad (vc), Yashasvi Jaiswal, Tilak Varma, Rinku Singh, Sanju Samson (wk), Jitesh Sharma (wk), Shivam Dube, W Sundar, Shahbaz Ahmed, Ravi Bishnoi, Prasidh Krishna, Arshdeep…
— BCCI (@BCCI) July 31, 2023
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया टी 20 मालिकेचं वेळापत्रक
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, पहिला सामना, 18 ऑगस्ट.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, दुसरा सामना, 20 ऑगस्ट.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, तिसरा सामना, 23 ऑगस्ट.
टी 20 सीरिजसाठी आयर्लंड क्रिकेट टीम | पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वोरकॉम, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.
आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया | जस्प्रीत बुमराह (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड (व्हीसी), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार आणि आवेश खान.