Ireland tour of England : आयर्लंडची कमाल, 65 रन्सवर 5 विकेट पडूनही इंग्लंडच्या टीमला हरवलं 10 विकेटने
Ireland tour of England : आयर्लंडच्या संघाने कमालीचा खेळ दाखवत इंग्लंडच्या टीमला धक्का दिलाय. इंग्लंडला सूचक इशारा दिला आहे. त्यांची क्षमता लक्षात येते. ढेपाळल्यानंतर पुन्हा सावरणं सोपं नसतं.
लंडन : आयर्लंडची क्रिकेट टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड विरुद्ध आयर्लंडची टीम 1 टेस्ट आणि 3 वनडे सामन्याची सीरीज खेळणार आहे. 1 जूनपासून या सीरीजला सुरुवात होणार आहे. आयर्लंडच्या टीमने मुख्य सीरीजला सुरुवात होण्याआधीच इंग्लंडला सूचक इशारा दिला आहे. आपल्या कमजोर समजण्याची चूक करु नका, असा संदेश आयर्लंडने दिला आहे.
बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या टीमला भिडण्याआधी आयर्लंडने तिथली काऊंटी टीम एसेक्स विरुद्ध सामना खेळला. त्यांनी एसेक्सला 10 विकेटने हरवलं.
ढेपाळल्यानंतर सावरले
रेड बॉलने खेळलेला हा 3 दिवसाचा सामना आयर्लंडने तिसऱ्यादिवशी जिंकला. महत्वाच म्हणजे फलंदाजीत ढेपाळल्यानंतर आयर्लंडच्या टीमने विजयी कामगिरी केली. त्यावरुन त्यांची क्षमता लक्षात येते. ढेपाळल्यानंतर पुन्हा सावरणं सोपं नसतं.
? RECORD ?
Moor and McCollum now hold Ireland Men’s first-wicket partnership in first-class cricket.
They pass the Porterfield/Bray 202-run stand in 2007.
Congrats lads ?#BackingGreen ☘️? pic.twitter.com/PdQaxtQQr6
— Cricket Ireland (@cricketireland) May 28, 2023
65/5 ते 400 धावा
बेन स्टोक्स अँड कंपनीचा सामना करण्याआधी आयर्लंडच्या टीमची इंग्लंडच्या एसेक्स टीमशी मॅच झाली. एसेक्सने पहिला बॅटिंग करताना 343 धावा केल्या. आयर्लंडची बॅटिंग सुरु असताना, त्यांच्या 65 धावांवर 5 विकेट गेल्या होत्या. या अवघड परिस्थितीत टीमला अनुभवाचा फायदा झाला. पॉल स्टर्लिंग, लोरकान टकर आणि अँड्र्यू मॅक्ब्रायन यांनी सामन्याची धुरा आपल्या हाती घेतली.
स्टर्लिंगने 107 धावा फटकावल्या. टकर 97 रन्सची इनिंग खेळला. अँड्र्यू मॅक्ब्रायनने 67 धावा केल्या. परिणामी आयर्लंडच्या पहिल्या डावात 400 धावा झाल्या. त्यांनी 57 रन्सची आघाडी घेतली.
विजयासाठी किती धावांच टार्गेट?
एसेक्सने दुसरा डाव 8 विकेट 307 धावांवर घोषित केला. आयर्लंडसमोर विजयासाठी 232 रन्सच टार्गेट होतं. दुसऱ्याडावात आयर्लंडने कुठलीही चूक केली नाही. ओपनर पीटर मूरने (118) आणि जेम्स मॅक्कोलमने (100) दोघांनी शतक ठोकली. आयर्लंडने इंग्लंडच्या एसेक्स टीमवर 10 विकेटने विजय मिळवला. या विजयामुळे आयर्लंडचा आत्मविश्वास वाढणार आहे. याचा परिणाम 1 जूनपासून इंग्लंडच्या मुख्य संघाविरुद्ध सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यात दिसून येईल.