VIDEO : इशान किशनच्या कृत्यामुळे अक्षर पटेल भडकला, लाईव्ह मॅचमध्ये मागितली माफी, पाहा व्हिडीओ

IND vs ZIM, 2nd ODI : बुरलेच्या शॉटवर चेंडू क्षेत्ररक्षण करत असलेल्या इशान किशनपर्यंत पोहोचला. इशानने यष्टिरक्षकाच्या दिशेने फेकल्यावर चेंडू खेळपट्टीजवळ असलेल्या अक्षर पटेलच्या पाठीमागे लागला. अधिक वाचा...

VIDEO : इशान किशनच्या कृत्यामुळे अक्षर पटेल भडकला, लाईव्ह मॅचमध्ये मागितली माफी, पाहा व्हिडीओ
इशान किशनच्या कृत्यामुळे अक्षर पटेल भडकलाImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 9:17 AM

नवी दिल्ली : भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा (IND vs ZIM, 2nd ODI) पाच गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात असे अनेक क्षण आले, यामुळे चाहत्यांना आश्चर्य वाटले. शेवटच्या एकदिवसीय सामन्यात खराब यष्टीरक्षणामुळे लक्ष्यावर आलेल्या संजू सॅमसनने या सामन्यात उत्कृष्ट यष्टीरक्षण केले. त्याने विकेटच्या मागे असा झेल घेतला, ज्याने चाहत्यांची मने जिंकली. त्याचवेळी मैदानावर इशान किशन (Ishan Kishan) आणि अक्षर पटेल (Akshar Patel) यांच्यात वादही झाला. सामन्यादरम्यान झिम्बाब्वेच्या डावाच्या 28व्या षटकात शॉन विल्यम्स आणि रायन बर्ल फलंदाजी करत होते. बुरलेच्या शॉटवर चेंडू क्षेत्ररक्षण करत असलेल्या इशान किशनपर्यंत पोहोचला. इशानने यष्टिरक्षकाच्या दिशेने फेकल्यावर चेंडू खेळपट्टीजवळ असलेल्या अक्षर पटेलच्या पाठीमागे लागला. अक्षरने तोपर्यंत आपले डोके हाताने झाकले होते. या घटनेनंतर अक्षर रागाने इशानकडे पाहत होता. त्यानंतर इशानने अक्षरचीही माफी मागितली होती.

व्हिडीओ पाहा

दीपक चहरच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी

दुसऱ्या वनडेत दीपक चहरच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली. शार्दुलने निराश न होता तीन बळी घेतले. त्याच्या या घातक गोलंदाजीमुळे नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेचा संघ 161 धावांवर गडगडला.

शानदार झेल

टीम इंडियाचा यष्टीरक्षक संजू सॅमसनने शनिवारी झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या वनडे दरम्यान एक शानदार झेल घेतला. झिम्बाब्वेचा सलामीवीर कॅटानोला बाद करण्यासाठी उजवीकडे डायव्हिंग करताना सॅमसनने खेळादरम्यान एका हाताने झेल घेतला. काटेने सात धावा करून बाद झाला. इनोसंट काया, रेगिस चाकाबवा आणि ल्यूक जोंगवे यांना शार्दुल ठाकूरने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याचवेळी मधवरेरेला प्रसिद्ध कृष्णाने, सिकंदर रझाला कुलदीप यादवने, शॉन विल्यम्सला दीपक हुडाने आणि ब्रॅड इव्हान्सला अक्षरने बाद केले.

राहुलची पहिल्यांदा फलंदाजी

शनिवारी झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी डावाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या वनडेत धवन आणि शुभमन सलामीला उतरले होते. त्याचवेळी, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार केएल राहुलने धवनसह डावाची सुरुवात केली. सहा महिन्यांनंतर राहुल पहिल्यांदाच भारताकडून फलंदाजीसाठी आला. मात्र, त्याच्या फलंदाजीने निराशा केली आणि केवळ एक धाव काढता आली.

भारताने  पाच गडी राखून सामना जिंकला

धवन (33), शुभमन (222) यांच्या सुरेख खेळी आणि संजू सॅमसनच्या नाबाद 43 धावांच्या जोरावर भारताने हा सामना पाच गडी राखून जिंकला. भारतासाठी सॅमसनने विजयी धावा काढल्या. त्याने 26व्या षटकात षटकार खेचून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. सॅमसनची इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात विजयी धावा टाकण्यापूर्वी चाहते सॅमसनच्या नावाचा जयघोष करत होते. यानंतर सॅमसनने त्याला षटकार लगावत विजयाची भेट दिली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.