भावा जिंकलस! इशानच्या भावानं त्याच्यासाठी केलेला त्याग हा इशानला लावलेल्या बोलीपेक्षा मोठाय

Ishan Kishan Life : IPL Auction 2022 : 2018चं ऑक्शन सुरु होतं. अचानक इशानच्या वडिलांचा बीपी हाय झाला. त्यांना रुग्णालयात घेऊन जावं लागलं. उपचार सुरु होते. इतक्यात बातमी आली की इशानला मुंबईनं खरेदी केलंय.

भावा जिंकलस! इशानच्या भावानं त्याच्यासाठी केलेला त्याग हा इशानला लावलेल्या बोलीपेक्षा मोठाय
इशान आपल्या मोठ्या भावासोबत आणि कुटुंबीयांसोबत... (Photo ; Instagram/ishan)
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 12:41 AM

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या पलटनमध्ये इशान किशनची शानदार इन्ट्री होऊन आता काही वर्ष उलटली आहे. 2022मध्ये मुंबईनं त्याला पुन्हा रिटेन केलंय. 15 कोटीपेक्षा जास्तीची बोली लावत मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) त्याला रिटेन केलं. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी इशानचं कोटींची उड्डाणं घेतली आहेत. त्याचा प्रवास, त्याचं आयुष्य यात अनेकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अत्यंत मस्तीखोर, खोडकर असणारा इशान (Highest price in IPL Auction 2022 on Ishan Kishan) कोट्याधीश होण्याआधी त्याला मोठं करणाऱ्यांची किंमत कशातच करता येणार नाही. दी वॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडचा (Rahul Dravid) तर इशानवर प्रचंड प्रभाव आहेच. शिवाय इशानची आताची शान ही खरंतर त्याच्या भावामुळे त्याला आलेली आहे. आताचे दिवस म्हणजे भावाभावातली स्पर्धा करणाऱ्यांची आहे असं म्हटलं जातं. याला इशानचा भाऊ अपवाद आहे. इशान मोठा व्हावा म्हणून त्याच्या भावानं केलेला त्याग हा प्रचंड मोठा आहे. त्याची किंमत 15.25 कोटीत तर सोडाच, पण अख्ख्या आयपीएलची रक्कम दिली, तरी करता येणार नाही.

काय केलं इशानच्या भावानं?

बिहारच्या नवाडा इथं जन्माला आलेल्या इशान किशनला एक मोठा भाऊ आहे. वयाच्या सातव्या वर्षापासून क्रिकेट खेळायला लागलेल्या इशानच्या भावानं त्याच्यासाठी त्याग केला. इशानच्या मोठ्या भावाचं नाव आहे राज. राजही लहानपणापासूनच क्रिकेट खेळत होता.

इशानच्या वडिलांचा बांधकाम व्यवसाय होता. आपली दोन्हीही मुलं क्रिकेटमध्ये करीअर करण्यासाठी इच्छुक असल्याचं त्यांना कळलं. पण जेव्हा त्यांना हे कळलं तेव्हा त्यांना क्रिकेटमध्ये करीअर करण्यामधली रिस्कही माहीत झाली होती. तेव्हा आपल्या दोन्ही मुलांना त्यांनी विचारलं की तुमच्या दोघांपैकी कुणालातरी एकालाच मी क्रिकेटमध्ये करीअर करण्यासाठी परवानगी देऊ शकतो! दोघांनाही क्रिकेटमध्ये करीअर करता येणार नाही, असं त्यांनी बजावलं!

तेव्हा इशानचा मोठा भाऊ असलेल्या राजनं इशानला क्रिकेट खेळायला मिळावं, म्हणून त्याग केला. आज त्याच इशानला आयपीएलच्या ऑक्शनच्या पहिल्या दिवशी मुंबई इंडियन्सचं तब्बल 15.25 कोटीची सर्वाधिक बोली लावत रिटेन करण्यात आलंय. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी इतकं यश इशानला मिळालं, त्यामागे लहानपणीच त्याच्या भावानं केलेला त्याग आता विसरता कामा नये!

मजामस्तीत गेला आणि सिलेक्ट झाला!

14 वर्षांखालील संघात स्थान मिळवण्यासाठी इशान इच्छुक होता. वडिलांना माहीत होतं, की याची काही निवड होणार नाही. म्हणून मजामस्तीत इशानला त्याचे वडील त्याच्या मोठ्या भावासह निवड चाचणीसाठी घेऊन गेले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे निवड चाचणीवेळी दोन-तीन शॉट मारल्यानंतर लगेचच इशानची निवड करण्यात आली होती.

त्यानंतर वयाच्या 15 व्या वर्षी झारखंडकडून इशान खेळू लागला. त्यानंतर 16 वर्षाखालील संघात त्याचा समावेश झाला. मग अंडर-19 टीममध्ये त्यानं स्थान मिळवल्यानंतर विजय हजारेसाठीही इशान खेळला. त्यानंतर रणजीसाठीही त्याची निवड झाली. अर्थात हे सगळं शक्य झालं, त्याच्या भावासह त्याच्या कुटुंबीयांनी त्याला सातत्यानं दिलेल्या प्रोत्साहनामुळे!

…आणि दी ग्रेट वॉल द्रविडही अवाक् झाला

रणजीतील सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्या इशाननं केलेल्या खेळीनं राहुल द्रविडही अवाक् झाला होता. झारखंडच्या संघातून खेळताना इशानने तेव्हा तब्बल 273 धावा कुटल्या होत्या. त्याही 14 तडाखेबाज सिक्सर ठोकत!

15.25 कोटीची बोली लागल्यावर इशान काय म्हणाला ऐका..

अंडर-19 संघात असताना राहुल द्रविडनं या गुणी खेळाडूवर केलेल्या संस्कारांनी इशान अधिकच प्रभावी आणि सकस खेळाडू होत गेला. अंडर-19चा प्रशिक्षक असताना राहुल द्रविडसोबत इशाननं घालवलेला काळ त्याच्या आजच्या खेळीतून अनेकदा झळकताना दिसतो. भलेही इशान हा आक्रमक फलंदाज असेल. पण कुठं थांबायचं आणि कुठं पुन्हा सुरु करायचं, याचं स्किलही त्यानं अनेकदा आपल्या शानदार खेळींमधून दाखवून दिलंय. म्हणून मुंबई इंडियन्सनं त्याला इतकी जबरदस्त किंमत मोजून आपल्या संघात रिटेन केलंय.

आयपीएलमध्ये सुरुवात कुठून झाली?

2016 साली इशाननं आयपीएलमध्ये इन्ट्री केली होती. गुजरात लायन्स संघातून त्यानं खेळायला सुरुवात केली. त्यानंतर 2017 मध्येही त्याला गुजरातनं रिटेन केलं होतं.

..आणि वडिलांचा बीपी नॉर्मल झाला!

2018चं ऑक्शन सुरु होतं. अचानक इशानच्या वडिलांचा बीपी हाय झाला. त्यांना रुग्णालयात घेऊन जावं लागलं. उपचार सुरु होते. इतक्यात बातमी आली की इशानला मुंबईनं खरेदी केलंय. हे कळताच बीपीची मशिन लावलेल्या इशानच्या बाबांना आपल्या पोराला कुठं ठेवू आणि कुठं नको असं झालं होतं. बीपीची मशिन एका बाजूला फेकून देत इशानचे बाबा एकच जल्लोष करु लागले होते.

संबंधित बातम्या :

#Ishankishan : इशान किशन ठरला महागडा खेळाडू, मीम्स शेयर करत चाहत्यांचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Ishan kishan IPL Auction 2022 : असं काय आहे इशानमध्ये की आतापर्यंतची सर्वात मोठी बोली त्याच्यावर लागली?

Ishan Kishan IPL 2022 Auction: इशानसाठी कायपण, मुंबई तिघांना भिडली, अखेर 15.25 कोटींना घेतलं विकत

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.