Video : टीम इंडियात पदार्पणासाठी इशान किशनने वापरली सर्व अस्त्र, आता सामन्यात बजावली अशी भूमिका

दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात इशान किशनला इंडिया सी संघाकडून संधी मिळाली. या संधीचा पुरेपूर फायदा इशान किशनने घेतला. बुची बाबू स्पर्धेनंतर दुलीप ट्रॉफी स्पर्धेतही त्याची बॅट चांगलीच तळपली. शतकी खेळी करत त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तसेच एक वेगळीच भूमिका बजावताना दिसला.

Video : टीम इंडियात पदार्पणासाठी इशान किशनने वापरली सर्व अस्त्र, आता सामन्यात बजावली अशी भूमिका
Follow us
| Updated on: Sep 14, 2024 | 9:41 PM

दक्षिण अफ्रिका दौरा अर्धवट सोडून आल्यापासून इशान किशन टीम इंडियात कमबॅकसाठी धडपड करत आहे. पण त्याला संघात स्थान मिळवण्यासाठी बरीच स्पर्धा करावी लागणार आहे. कारण संघात ऋषभ पंत, केएल राहुल यांच्यासारखे विकेटकीपर फलंदाज आहेत. त्यामुळे त्याला आता कामगिरीतूनच काय ते सिद्ध करून दाखवावं लागणार आहे. पण दुखापतीमुळे इशान किशन पहिल्या टप्प्यातील सामन्यांना मुकला. पण दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या टप्प्यात त्याची अचानक इंडिया सी संघात एन्ट्री झाली. त्याने पहिल्या सामन्यात 126 चेंडूत 111 धावांची खेळी केली. इशान किशन इतक्यावरच थांबला नाही. तर दुसऱ्या दिवशी त्याने गोलंदाजीही केली. इशान किशनने एक षटक टाकलं. त्यामुळे इशान किशनची टीम इंडियात पुनरागमनासाठी धडपड असल्याचं दिसून येत आहे.

इशान किशनने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सहाव्यांदा गोलंदाजी केली. यापूर्वी त्याने 2018 मध्ये रणजी स्पर्धेत झारखंडकडू खेळताना उत्तर प्रदेशविरुद्ध चार षटकं टाकली होती. त्यानंतर 2022 मध्ये रणजी ट्रॉफी सीजनमध्ये सर्व्हिसेजकडून खेळताना एक षटक टाकलं होतं. आता हे त्याच्या फर्स्ट क्रिकेट कारकिर्दितलं सहावं षटक होतं. इंडिया बी संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा 73वं षटक टाकण्याची जबाबदारी इशान किशनने घेतली. त्यावेळेस मैदानात अभिमन्यू ईश्वरन आणि वॉशिंग्टन सुंदर फलंदाजी करत होते. या षटकात विकेट तर मिळाली नाही, पण 7 धावा मिळाल्या.

इशान किशनला 2024 वर्षात एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. बीसीसीआयच्या दणक्यानंतर पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटकडे मोर्चा वळवला आहे. दुलीप ट्रॉफीआधी चेन्नईत रंगलेल्या बुची बाबू स्पर्धेतही इशान किशनने गोलंदाजी केली होती. दरम्यान, इंडिया बी आणि इंडिया सी यांच्यातील सामना ड्रॉकडे झुकला आहे. या सामन्याचा चौथा शेवटचा दिवस शिल्लक आहे. तीन दिवसांचा खेळ संपला असून अजूनही पहिल्या डावाचा खेळ संपलेला नाही.  दुसरीकडे श्रेयस अय्यरही इंडिया डी संघाकडून गोलंदाजी करताना दिसला. तसेच सहा वर्षानंतर एक विकेट घेण्यात त्याला यश मिळालं.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.