Ishant sharma IPL 2023 : गायब होता, परतला, तो वादळ बनून, इशांतचा एकच बॉल पण एकदम कडक, VIDEO
Ishant sharma IPL 2023 : डेल स्टेन पण बोलला, याआधी असा चेंडू बघितला नाही. एकदा VIDEO बघा म्हणजे समजेल. क्रिकेटमध्ये सुद्धा नकली बॉलचा गोलंदाज वापर करतात. पण तो अचूकतेने वापरण्यासाठी तुमच्याकडे कौशल्य लागतं.

अहमदाबाद : नक्कल करायला पण अक्कल लागते. क्रिकेटमध्ये सुद्धा नक्कल केली जाते. क्रिकेटमध्ये सुद्धा अनेक प्लेयर नकली बॉलचा अस्त्रासारखा उपयोग करतात. पण कोण, तो चेंडू अचूकतेने वापरतो, मॅचमध्ये त्यावर सर्वकाही अवलंबून असतं. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा असे नकली बॉल टाकण्यामध्ये माहीर आहे. या बद्दल कुणाच्याही मनात शंका नसावी.
गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात इशांत शर्माने त्याच्या कोट्यातील 4 ओव्हर टाकल्या. पण त्याचा एक चेंडू चर्चेत राहिला. इशांतने टाकलेल्या या चेंडूच सर्वत्र कौतुक होतय. हा चेंडू खूपच घातक होता. समोरच्या बॅट्समनला संधीच मिळाली नाही. इशांत शर्माने टाकलेला हा नकली चेंडू होता.
चेंडूसमोर हतबल असल्याची त्याची भावना
इशांतने टाकलेल्या या नकली चेंडूचा वेग 119 किमी प्रतितास होता. गुजरातच्या इनिंगची 5 वी ओव्हर संपणार होती. इशांतचा हा ओव्हरमधील लास्ट बॉल होता. या चेंडूवर इशांत शर्माने विजय शंकरला क्लीन बोल्ड केलं. विजय शंकर या चेंडूसमोर असहाय्य होता. बॉल टप्पा पडल्यानंतर कुठे गेला ते शंकरला सुद्धा समजलं नाही. या चेंडूसमोर हतबल असल्याची त्याची भावना होती.
डेल स्टेन इशांच्या या चेंडूवर काय म्हणाला?
इशांत शर्माच्या या नकली बॉलची कमाल आणि त्याची अचूकता ज्यांनी बघितली, ते फॅन झाले. या चेंडूसाठी इशांतच सर्वात जास्त कौतुक दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने केलं. विकेट घेण्यासाठी नकली बॉलचा इतका उत्तम वापर याआधी मी कधी पाहिलेला नाही, असं डेल स्टेनने त्याच्या टि्वटमध्ये म्हटलय. डेल स्टेनकडे एक मोठा अनुभव आहे.
Okay, Ishant just bowled the best knuckle ball wicket I’ve ever seen!
— Dale Steyn (@DaleSteyn62) May 2, 2023
मोक्याच्या क्षणी आणखी एक विकेट
नकली बॉलवर इशांत शर्मा विजय शंकरची विकेट घेऊनच थांबला नाही. त्याने आणखी एक विकेट घेतला. मॅचच्या लास्ट ओव्हरमध्ये त्याने राहुल तेवतियाची सुद्धा विकेट घेतली. इशांत शर्माने 4 ओव्हरमध्ये 23 रन्स देऊन 2 विकेट काढल्या. हा विकेट घेताना सुद्धा त्याने 119 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता.
Deception at its best! ??
What a ball that from @ImIshant ??#GT have lost four wickets now and this is turning out to be a tricky chase!
Follow the match ▶️ https://t.co/VQGP7wSZAj #TATAIPL | #GTvDC pic.twitter.com/j7IlC7vf0X
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
छोट्या टार्गेटचा दिल्लीकडून यशस्वी बचाव
दिल्ली कॅपिटल्सने या सामन्यात खूप कमी धाव केल्या होत्या. त्यांनी गुजरात टायटन्सला विजयासाठी फक्त 131 धावांच टार्गेट दिलं होतं. टी 20 क्रिकेटमध्ये हे खूप छोटं लक्ष्य आहे. पण दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर बॉलिंग करुन दिल्ली कॅपिटल्सला 5 रन्सनी विजय मिळवून दिला.
