एकदम कडक! जेम्स अँडरसनच्या इन स्विंगरवर जो रुटच्या दांड्या गुल, काउंटीमधला क्लासिक बॉल एकदा बघाच VIDEO
अँडरसनने ज्यो रुटला अवघ्या चार रन्सवर इन स्विंगवर क्लीनबोल्ड केलं. अँडरसनने टाकलेला चेंडू इतका अप्रतिम होता की, रुटला त्यावर काहीच करता आलं नाही.
मुंबई: भारतात आयपीएल स्पर्धा होत असताना, इंग्लंडमध्ये काउंटीचा सीजन (County season) सुरु आहे. लीडस हेडिंग्ले येथे यॉर्कशायर आणि लँकाशायरमध्ये (Yorkshire vs Lancashire) एक मोठ्या धावसंख्येचा सामना झाला. लँकाशायरकडून या सामन्यात किटॉन जेनिंग्सने द्विशतक झळकावलं. स्टीव्हन क्रॉफ्टने 104 धावा केल्या. यॉर्कशायरकडून जो रुटने (Joe Root) 147 धावांची धडाकेबाज खेळी केली. पण त्याला दुसऱ्या फलंदाजांकडून साथ मिळू शकली नाही. 126.5 षटकात यॉर्कशायरचा डाव 379 धावात आटोपला. लँकाशायरने यॉर्कशायरवर फॉलोऑन दिला. त्यामुळे यॉर्कशायरच्या संघाला पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात यावं लागलं. पहिल्या इनिंगप्रमाणे दुसऱ्या डावातही यॉर्कशायरचा डाव गडगडला. पुन्हा एका जो रुटवर यॉर्कशायरला संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी होती. पण जेम्स अँडरनसच्या गोलंदाजीमुळे मार्ग अजून बिकट झाला.
फक्त मधला एक स्टम्प राहिला
अँडरसनने ज्यो रुटला अवघ्या चार रन्सवर इन स्विंगवर क्लीनबोल्ड केलं. अँडरसनने टाकलेला चेंडू इतका अप्रतिम होता की, रुटला त्यावर काहीच करता आलं नाही. फक्त मधला एक स्टम्प राहिला. बाजूचे दोन्ही स्टम्पस पडले. इंग्लंडचा माजी कर्णधार निराश होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.
James Anderson bowls Joe Root ?
Big celebs from Jimmy for that wicket!#LVCountyChamp pic.twitter.com/y4FnvUAJ3u
— LV= Insurance County Championship (@CountyChamp) May 15, 2022
कसोटी ड्रॉ झाल्याने आम्ही समाधानी
काही सत्रांमध्ये संघाला कशी वरचढ ठरण्याची संधी होती. सामना ड्रॉ झाल्यामुळे आपण आनंदी असल्याचं यॉर्कशायरचे कोच ओटीस गिब्सन यांनी सांगितलं. कसोटी ड्रॉ झाल्याने आम्ही समाधानी आहोत. “हे चार दिवस खूप कठीण होते. ड्रेसिंग रुममध्ये आम्ही यावर फार कमी बोललो असू” असं गिब्सन म्हणाले. जो रुटच्या फलंदाजीच त्यांनी कौतुक केलं. तो जगातला एक सर्वोत्तम फलंदाज आहे. असं गिब्सन म्हणाले.