गॅरी कर्स्टन यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर या खेळाडूकडे पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदाची धुरा

पाकिस्तान क्रिकेट संघात गेल्या काही दिवसात काय घडेल सांगता येत नाही. रोज काही ना काही घडामोड घडत असते. असं असताना आता गॅरी कर्स्टन यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पीसीबीने तात्काळ नव्या माणसाची घोषणा केली आहे.

गॅरी कर्स्टन यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर या खेळाडूकडे पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदाची धुरा
Image Credit source: (फोटो-GETTY IMAGES)
Follow us
| Updated on: Oct 28, 2024 | 3:39 PM

पाकिस्तान क्रिकेट संघाची कसोटी क्रिकेटची गाडी आता हळूहळू रुळावर येत आहे. इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर टीकेची झोड उठली होती. मात्र उर्वरित दोन सामन्यात पाकिस्तानने कमबॅक केलं आणि मालिका 2-1 ने जिंकली. असं असताना व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ घडली आहे. दिग्गज खेळाडू आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पीसीबी आणि गॅरी कर्स्टन यांच्यातील वाद टोकाला गेल्याची चर्चा होती. अखेर पीसीबीनेही गॅरी कर्स्टन यांचा राजीनामा काही तासातच मंजूर केला आहे. तसेच काही मिनिटातच नव्या कर्णधारपदाची घोषणा केली आहे. जेसन गिलेस्पी याच्या खांद्यावर कसोटी संघाची धुरा होती. आता वनडे आणि टी20 संघाची जबाबदारीही जेसन गिलेस्पी याला सांभाळावी लागणार आहे. पण ही जबाबदारी तात्पुरत्या स्वरुपाची असल्याची चर्चा आहे. पाकिस्तान झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे या दोन दौऱ्यांसाठी जेसन गिलेस्पीच्या खांद्यावर धुरा असेल. त्यानंतर नव्या व्यक्तीची निवड केली जाईल.

पाकिस्तानच्या मिडिया रिपोर्टनुसार, गॅरी कर्स्टन आपल्या पदाचा राजीनामा देऊ इच्छित नव्हता. त्याने झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पूर्ण तयारी केली होती. पण पीसीबीने उचलेल्या एका पावलामुळे सर्व काही बिनसलं. पीसीबीने गॅरी कर्स्टन यांच्याकडून खेळाडू निवडीचा अधिकार हिरावून घेतला. त्यामुळे गॅरी कर्स्टन नाराज झाला होता.त्यानंतर पीसीबीने असं वातावरण तयार केली की त्याला पद सोडण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मोहम्मद रिझवानकडे ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघाचं कर्णधारपद सोपवलं आहे. ऑस्ट्रेलिया दौरा 4 नोव्हेंबरपासून असणार आहे.

दरम्यान, खेळाडू निवडीचा अधिकार हिरावून घेतल्यानेतर प्रशिक्षक जेसन गिलेस्पीही नाराज आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने याबाबत स्पष्टपणे सांगितलं होतं. माझ्याकडे खेळाडू निवडीचा अधिकार नाही आणि त्यामुळे खेळाडूंच्या निवडीबाबत काहीच बोलू शकत नसल्याचं, गिलेस्पीने सांगितलं होतं. दुसरीकडे, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी अवघ्या 4 महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. अश्यात पाकिस्तान संघासाठी अनपेक्षित बदल त्रासदायक ठरू शकतात.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.