IPL 2021 : बायकोच्या दिलखेचक अदांवर जसप्रीत फिदा, रोमँटिक कमेंट करत सौंदर्याचं कौतुक!

मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन हिने सोशल मीडियावर मुंबईची मॅच सुरु होण्याअगोदर एक फोटो पोस्ट केला. याच फोटोवर जसप्रीतने रोमँटिक कमेंट करत तिच्या सौंदर्याचं वर्णन केलं. (IPL 2021 jasprit Bumrah Comment On Sanjana Ganesan photo)

IPL 2021 : बायकोच्या दिलखेचक अदांवर जसप्रीत फिदा, रोमँटिक कमेंट करत सौंदर्याचं कौतुक!
संजना गणेशन आणि जसप्रीत बुमराह
Follow us
| Updated on: Apr 24, 2021 | 8:06 AM

मुंबई : आयपीएलची (IPL 2021) धुम सुरु आहे. मॅच सुरु होण्याच्याअगोदर किंवा संपल्यानंतर खेळाडू तसंच खेळाडूंच्या पत्नी सोशल मीडियावर आपले फोटोज पोस्ट करत असतात. त्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असतात. मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) हुकमी एक्का जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganesan) हिने सोशल मीडियावर मुंबईची मॅच सुरु होण्याअगोदर एक फोटो पोस्ट केला. याच फोटोवर जसप्रीतने रोमँटिक कमेंट करत तिच्या सौंदर्याचं वर्णन केलं. (IPL 2021 jasprit Bumrah Comment On Sanjana Ganesan photo)

संजनाकडून सुंजर फोटो पोस्ट, जसप्रीत बुमराहची रोमँटिक कमेंट

मुंबई-पंजाबविरुद्धच्या सामन्याअगोदर संजनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक सुंदर फोटो शेअर केला. या फोटोत ती कमालीची सुंदर दिसत होती. ‘चांगला प्रकाश शोधा आणि सुंदर फोटो काढा’, असं कॅप्शन तिने आपल्या फोटोला दिलं होतं. याच फोटोवर जसप्रीतने रोमँटिक कमेंट केली. हा फोटो त्याला इतका आवडला की त्याने 2 हार्ट इमोजी कमेंट केल्या. हृदयापासून हृदयापर्यंत त्याला हा फोटो आवडला.

संजनाने या फोटोत निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. या ड्रेसवर काळ्या रंगाची बोल्ड प्रिंट आहे. फोटोत मेकअप खूप साधा दिसत आहे. ओठांवर लाईट रंगाची लिपस्टिक आहे. एकूणच संजना या फोटोत कमालीची सुंदर दिसत आहे.

jasprit Bumrah Comment On Sanjana Ganesan photo

बुमराहची स्पेशल कमेंट

संजनाच्या प्रेमाचा खास अंदाज

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर् बंगळुरु (Mi vs RCB) यांच्यात आयपीएलच्या 14 व्या पर्वातील सलामीचा सामना पार पडला. या सामन्याचं समालोचन करण्यासाठी पेशाने समालोचक असलेली जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन जेव्हा आली तेव्हा तिने अंगावर वन शोल्डर निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. साहजिक नेटकऱ्यांना हे कनेक्शन कळालं आणि त्यांच्या प्रतिभेला बहर आला. कुणी म्हणालं प्रेम असावं तर असं… तर कुणी म्हणालं, नवरा बायकोचं प्रेमचं वेगळं असतं…!

बुमराह आणि संजना मार्च महिन्यात विवाहबद्ध

टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) नुकताच विवाहबद्ध झाला. प्रसिद्ध क्रीडा निवेदिका संजना गणेशनसोबत (sanjana ganesan) तो लग्नबेडीत अडकला. हा विवाहसोहळा गोव्यात पार पडला. बुमराहबरोबर लग्नासाठी संजना गणेशन आणि आणि (Anupama Parameswaran) दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन यांच नाव चर्चेत होतं. पण अखेर बुमराहने संजनासोबत लगीनगाठ बांधली.आता बुमराहच्या जीवनातील नव्या इनिंगला सुरुवात झाली आहे.

(IPL 2021 jasprit Bumrah Comment On Sanjana Ganesan photo)

हे ही वाचा :

IPL 2021 : नाद करा पण माझा कुठं?, रैना-कोहलीला पछाडत रोहित शर्माचा ऐतिहासिक रेकॉर्ड!

IPL 2021 : इशान किशनला झालंय तरी काय?, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी घेतली शाळा!

VIDEO | ख्रिस गेलचे गगनचुंबी षटकार पाहून कोच जॉन्टी ऱ्होड्सची जबरदस्त रिअ‍ॅक्शन

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.