Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jay Shah : सौरव गांगुलींचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा नाहीच! जय शहांच्या नावाची मात्र जोरदार चर्चा

Sourav Ganguly Resign News BCCI President : गांगुलीनं त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.

Jay Shah :  सौरव गांगुलींचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा नाहीच! जय शहांच्या नावाची मात्र जोरदार चर्चा
सौरव गांगुली आणि जय शहा
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 7:35 PM

मुंबई :  माजी कर्णधार सौरव गांगुलींच्या (Saurav Ganguly) एका ट्विटनं आज खळबळ उडवून दिली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचं सौरव गांगुलीनं या ट्विटमध्ये सूचित केलं आहे. गांगुलीने सोशल मीडियावर एक पोस्टही लिहिली आहे. त्यांच्या या पदानंतर ते आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची बातमी आगीसारखी पसरली. गांगुलीनं त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल चाहते आणि सहकारी खेळाडूंचे आभार मानले आहेत. गांगुलीचा कार्यकाळ सप्टेंबर 2022 मध्ये संपणार आहे. दरम्यान, गांगुली यांनी राजीनामा दिला नसल्याचं बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सांगितलंय. तर राजीनाम्याची बातमी पसरल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) हे बीसीसीआयचे अध्यक्ष बनणार असल्याची चर्चा होऊ लागली होती. सौरव गांगुली आणि जय शहा यांची घट्ट मैत्री असून आयपीएलची (IPL 2022) फायनल देखील दोघांनी सोबत बसून पाहिला.

सौरव गांगुलींचे ट्विट

गांगुलीने ट्विटरवर लिहिलंय की, ‘2022 हे माझे क्रिकेटमधील 30वे वर्ष आहे. मी 1992 मध्ये खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून क्रिकेटने मला खूप काही दिले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला तुम्हा सर्वांचा पाठिंबा मिळाला आहे. माझ्या प्रवासाचा भाग असलेल्या प्रत्येकाचे मी आभार मानू इच्छितो. मला पाठिंबा दिला आणि आज मी जिथे आहे तिथे पोहोचण्यास मदत केली. आज मी काहीतरी सुरू करण्याची योजना आखत आहे जे मला वाटते की कदाचित बर्याच लोकांना मदत होईल. मला आशा आहे की जीवनाच्या या नवीन अध्यायात तुम्ही माझ्यासोबत राहाल.’ असं सौरव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

दरम्यान, शहा यांचा मुलगा आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. यामुळे चर्चेला उधाण आलंय.

कोण आहेत जय शहा?

बीसीसीआयमध्ये सचिव आहेत जय शहा. 32 वर्षीय जय शहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र आहेत. ते 23 ऑक्टोबर 2019 पासून बीसीसीआयचे सचिव आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली सध्या रुग्णालयात  होते त्यावेळी शहा यांच्याकडं बीसीसीआयचा सर्व कारभार होता. भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारी कसोटी मालिका त्याच बरोबर देशांतर्गत होणाऱ्या स्पर्धा याचे नियोजनासाठी ते काम करतात. सौरव गांगुली यांचे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांचे मित्र आहेत. आयपीएलची फायनल देखील दोघांनी सोबत बसून पाहिला.

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.