Joe Root Six : जिगरा लागतो जिगरा, खायचं काम नाही, रूटचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल!
चौथ्या दिवशी इंग्लंड संघ ऑल आऊट झाला असला तरी जो रूटने अवघ्या क्रिकेट जगताचं लक्ष वेधलं आहे. कोणाच्या मनी ध्यानी नव्हतं आणि रूटने करामत करून दाखवली.
मुंबई : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये अॅशेस मालिका सुरू आहे. पहिला सामना चालू असून सामन्यात रंगत आलेली पाहायला मिळत आहे. कसोटी सामना असला तरी थरार हा असतोच, इंग्लंडचा संघ सध्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यामध्ये सरस पाहायला मिळतो. चौथ्या दिवशी इंग्लंड संघ ऑल आऊट झाला असला तरी जो रूटने अवघ्या क्रिकेट जगताचं लक्ष वेधलं.
नेमकं काय झालं?
ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार बॉलर स्कॉट बोलँड याच्या रिव्हर्स शॉर्ट खेळत सिक्सर मारला. सुरूवातीला फलंदाज सावध पवित्रा घेताना दिसतात. मात्र जो रूटने दिवसाचा पहिला बॉल हा रिव्हर्स स्कूप खेळत सर्वांना धक्का दिला होता. मात्र त्यावेळी चेंडूचा संपर्क झाला नव्हता. रुट कसोटी क्रिकेटमध्ये टी-20 स्टईलमध्ये बॅटींग करताना पाहून अनेकांना पाहायला जड गेलं असावं. कारण 50 किंवा 60 चेंडू खेळून 10 धावा पण केल्या जातात. मात्र टी-20 स्टाईल फटके कसोटीमध्ये खेळून त्याने सर्वांना अवाक केलं.
पाहा व्हिडीओ-
A ramp-bunctious start from Joe Root ?
What is going on!? ??♂️ #EnglandCricket | #Ashes pic.twitter.com/ieMdbBnRAH
— England Cricket (@englandcricket) June 19, 2023
एजबॅस्टन येथे पहिल्याच दिवशी इंग्लंडने पहिला डाव घोषित केला होता. या संघाने 78 षटकात 393 धावा करत आपला डाव घोषित केला. यानंतर इंग्लिश संघाने ऑस्ट्रेलियाचा 386 धावांत समावेश करून 7 धावांची आघाडी मिळवली होती.
इंग्लंडचा दुसरा डाव 273 धावांवर आटोपला असून आता कांगारूंना 178 धावांची गरज आहे. डेव्हिड वॉर्नर 36, मार्नस लॅबुशेन 13, स्टीव्हन स्मिथ 6 धावांवर बाद झाले आहेत. आता मैदानात उस्मान ख्वाजा नाबाद 34 आणि स्कॉट बोलँड नाबाद 9 धावांवर खेळत आहेत.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), नॅथन लियॉन, जोश हेझलवूड आणि स्कॉट बोलँड.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), बेन डकेट, झॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, ऑली रॉबिन्सन आणि जेम्स अँडरसन.