Jofra Archer IPL 2022 Auction: खेळणार नाही तरी मुंबई इंडियन्सने आठ कोटी मोजून जोफ्रा आर्चरला का विकत घेतलं?

Jofra Archer IPL 2022 Auction: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) दुखापतग्रस्त असल्यामुळे यंदाच्या IPL मध्ये खेळणार नाही.

Jofra Archer IPL 2022 Auction: खेळणार नाही तरी मुंबई इंडियन्सने आठ कोटी मोजून जोफ्रा आर्चरला का विकत घेतलं?
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 6:02 PM

मुंबई: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) दुखापतग्रस्त असल्यामुळे यंदाच्या IPL सीजनमध्ये मध्ये खेळणार नाही. तरीही आर्चरला मुंबई इंडियन्सने विकत घेतलं. जोफ्रा आर्चरला मुंबई इंडियन्सने (Mumbai indians) आठ कोटी रुपये मोजून विकत घेतलं. मागच्यावर्षी सुद्धा आर्चर आयपीएलमध्ये खेळला नव्हता. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासूनही लांब आहे. IPL मध्ये आर्चरचा रेकॉर्ड चांगला आहे. त्यामुळे त्याच्यावर बोली लावण्यात आली. आर्चरने 35 आयपीएल सामन्यांमध्ये 46 विकेट घेतल्या असून त्याचा इकॉनमी रेट प्रति षटक 7.13 आहे.

2018 मध्ये बोली लागली होती 

जोफ्रा आर्चरवर सर्वप्रथम 2018 च्या आयपीएल ऑक्शनमध्ये बोली लागली होती. त्यावेळी त्याची बेस प्राइस फक्त 40 लाख रुपये होती. आर्चरला विकत घेण्यासाठी दिल्ली आणि चेन्नई टीम्समध्ये चुरस दिसली होती. त्याच्यावर लागलेली बोली 3.40 कोटीपर्यंत पोहोचल्यानंतर पंजाबने त्यात उडी घेतली. सनरायजर्स हैदराबाद आर्चरसाठी पाचकोटी रुपये मोजायला तयार होता. पण राजस्थान रॉयल्सने 7.20 कोटीची बोली लावून आर्चरला विकत घेतलं होतं.

जोफ्रा आर्चरची आयपीएलमध्ये दमदार कामगिरी 

जोफ्रा आर्चरने आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये दमदार प्रदर्शन केलं होतं. त्याने 10 सामन्यात 15 विकेट घेतल्या होत्या. 2019 मध्ये आर्चरने 11 सामन्यात 11 विकेट घेतल्या. प्रतिषटक त्याचा इकॉनमी रेट 6.76 होता. 2014 मध्ये जोफ्रा आर्चरने 14 सामन्यात 20 विकेट घेतल्या. प्रति षटक त्याचा इकॉनमी रेट 6.55 होता. जोफ्रा आर्चरकडे टी 20 फॉर्मेटमधील 121 सामन्यांचा अनुभव आहे. त्याने एकूण 153 विकेट घेतल्या आहेत. 18 धावात चार विकेट हे त्याचे सर्वोत्तम गोलंदाजीचे आकडे आहेत. पावरप्लेशिवया हाणामारीच्या षटकांमध्येही तो चांगली गोलंदाजी करतो. जोफ्रा आर्चरचे हेच आकडे बघून मुंबई इंडियन्सने यंदाच्या सीजनमध्ये खेळणार नसला, तरी त्याला आठ कोटी रुपयांना विकत घेतलं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.