IPL 2022 Orange Cap: जॉस बटलर अजूनही सर्वात पुढे, दिग्गजांकडून आव्हान

आयपीएल 2022 (IPL 2022) मधील प्लेऑफची रोमांचक शर्यत आता सुरू होणार आहे. 2-2 गुणांसाठी आणि गुणतालिकेत पहिल्या 4 स्थानांवर पोहोचण्यासाठी संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. यासोबतच खेळाडूंमध्येदेखील मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे.

IPL 2022 Orange Cap: जॉस बटलर अजूनही सर्वात पुढे, दिग्गजांकडून आव्हान
Jos Buttler - Rahul TripathiImage Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 11:48 AM

मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील प्लेऑफची रोमांचक शर्यत आता सुरू होणार आहे. 2-2 गुणांसाठी आणि गुणतालिकेत पहिल्या 4 स्थानांवर पोहोचण्यासाठी संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. यासोबतच खेळाडूंमध्येदेखील मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. फलंदाजांमध्ये ऑरेंज कॅप पटकावण्याची स्पर्धा तर गोलंदाजांमध्ये पर्पल कॅप पटकावण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. या बाबतीतदेखील टॉप 4-5 खेळाडूंमध्ये खूप अटीतटीची स्पर्धा सुरु आहे. राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर आणि अनुभवी इंग्लिश फलंदाज जॉस बटलरसमोर ऑरेंज कॅपच्या (IPL Orange Cap) स्पर्धेत अनेक दिग्गज तसेच युवा खेळाडूंनी आव्हान निर्माण केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पहिल्या क्रमांकावर असणारा हा फलंदाज सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स (SRH vs KKR) यांच्यातील सामन्यानंतरही अव्वल स्थानावर कायम आहे.

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर शुक्रवारी (15 एप्रिल) हैदराबाद आणि कोलकाता यांच्यातील लढतीत धावांचा पाऊस पडला. परंतु ज्या बड्या फलंदाजांनी जास्त धावा काढण्याची अपेक्षा केली होती त्यांना या बाबतीत यश आले नाही. उदाहरणार्थ, केकेआरकडून व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, अॅरोन फिंच यांच्याकडून सर्वाधिक अपेक्षा होत्या. मात्र, संघाचा अनुभवी फलंदाज नितीश राणा आणि अनुभवी अष्टपैलू आंद्रे रसेल यांनी फलंदाजीची जबाबदारी सांभाळली. 6 डावात 179 धावा केल्यानंतर रसेल आता अव्वल 9 जणांमध्ये आहे. दुसरीकडे हैदराबादसाठी कर्णधार केन विल्यमसन आणि सलामीवीर अभिषेक शर्मा या सामन्यात अपयशी ठरले, पण राहुल त्रिपाठी आणि एडन मार्कराम यांनी निश्चितपणे मॅचविनिंग अर्धशतके झळकावली.

बॉटलर अव्वल स्थानी

या मोसमातील 25 व्या सामन्यानंतरही बटलरच्या स्थानावर कोणताही बदल झालेला नाही. स्पर्धेतील 5 डावांनंतरही बटलर 272 धावांसह अव्वल स्थानावर आहे. त्याच्यापाठोपाठ गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने 228 धावा केल्या आहेत. हैदराबाद-कोलकाता सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास राहुल त्रिपाठीने कालच्या 71 धावांच्या खेळीनंतर 171 धावा केल्या आहेत आणि तो 11व्या क्रमांकावर आहे. तो सध्या हैदराबादसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याचा साथीदार मार्करामने 149 धावा केल्या आहेत.

बटलर सिक्सर किंग

केवळ धावांच्या बाबतीतच नाही तर षटकार ठोकण्याच्या बाबतीतही जॉस बटलर अव्वल आहे. या स्फोटक फलंदाजाने आतापर्यंत 5 डावात 18 षटकार ठोकले आहेत. त्याच्यापाठोपाठ KKR चा विध्वंसक फलंदाज रसेलचा क्रमांक लागतो, ज्याच्या नावावर 16 षटकार आहेत. राजस्थानच्या शिमरॉन हेटमायरच्या नावावर 15 षटकार आणि चेन्नई सुपर किंग्जच्या शिवम दुबेच्या नावावर 13 षटकार आहेत.

इतर बातम्या

IPL 2022 DC vs RCB Live Streaming: जाणून घ्या दिल्ली विरुद्ध बँगलोर सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

IPL 2022, MI vs LSG : आज लखनौ मुंबईला रोखणार?, की इंडियन्सची विजयाची भूक यश खेचून नेणार?

IPL 2022, Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा सलग पाचवेळा पराभव, आज विजयश्री खेचून आणण्याची संधी

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.