क्रिकेटर केएल राहुल अभिनेत्री आथिया शेट्टीसह लग्नबेडीत, असं आहे क्रिकेट आणि बॉलिवूड कनेक्शन
बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं हे गेल्या अनेक दशकांपासूनचं आहे. टीम इंडियाच्या क्रिकेटरने नुकतंच बॉलिवूडची अभिनेत्रीसह लग्न केलं आहे.
मुंबई : क्रिकेट आणि बॉलिवूडचं नातं फार जवळचं आहे, हे पुन्हा सिद्ध झालंय. टीम इंडियाचा स्टार बॅट्समन केएल राहुल आणि अभिनेत्री आथिया शेट्टी विवाहबद्ध झालं आहे. यासह बॉलिवूड आणि क्रिकेटचे संबंध आणखी घट्ट झाले आहेत. दरम्यान याआधीही अनेक अभिनेत्र्यांनी टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंना पहिल्याच नजरेत क्लिन बोल्ड केलंय. त्यानंतर दोघांच्या नव्या इनिंगलाही सुरुवात झाली. केएल आणि आथिया यांच्या विवाहानिमित्ताने आपण आता क्रिकेटर-बॉलिवूड स्टार्स यांच्यातील पार्टनरशीपबद्दल जाणून घेऊयात.
सध्याच्या टीम इंडियातील 11 खेळांडूपैकी 4 क्रिकेटपटूंचं लग्न हे बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्र्यांसोबत झालं आहे. यामध्ये आता केएल राहुलचं नाव जोडलं गेलंय.
केएल राहुल-आथिया शेट्टी
केएल राहुल विवाहबंधनात अडकलाय. तो दिग्गज अभिनेता सुनील शेट्टीचा जावई झाला आहे. केएलने आथियासोबत लगीनगाठ बांधली. आथियाने हिरो, मोतीचूर-चकनाचूर आणि मुबारकां यासारख्या सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. तर केएल राहुलने आतापर्यंत बॅटिंगसह, विकेटकीपिंग आणि टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
विराट कोहली-अनुष्का शर्मा
विराट कोहलीचा विवाह अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत झाला आहे. विराट-अनुष्का अनेक वर्ष रिलेशनमध्ये होते. त्यानतंर दोघांनी 2017 मध्ये लग्न केलं. दोघांना 2021 मध्ये कन्यारत्न प्राप्त झालं जिचं नाव वामिका आहे.
हार्दिक पांड्या-नताशा स्तांकोविक
हार्दिक पांड्या आणि नताशा स्तांकोविक हे दोघे 2020 मध्ये विवाहबंधनात अडकले. नताशा ‘बिग बॉस’ या रियालिटी शोमध्ये सहभागी झाली होती. तसेच बॉलिवूडमध्ये तिने आयटम नंबर आणि अनेक भूमिका केल्या आहेत.
युजवेंद्र चहल- धनश्री वर्मा
टीम इंडियाचा लेग स्पीनर युजवेंद्र चहल कोरियोग्राफर धनश्री वर्मासोबत विवाहबद्ध झाला आहे. धनश्री कोरिग्राफरसोबत परफॉर्मरसुद्धा आहे.
या व्यतिरिक्त झहीर खान याचा विवाह अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत झाला आहे. सागरिकाने ‘चक दे इंडिया’, या सिनेमात अभिनय केलं आहे.
तसेच युवराज सिंहने बॉलिवूड एक्ट्रेस हेचल कीचसोबत लग्न केलंय. हेचलला खरी ओळखही सलमान खान याच्या ‘बॉडीगार्ड’ या सिनेमातून मिळाली.