IND vs AUS : ‘मी त्याच्या कानाखाली मारणार’, टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूवर भडकले कपिल देव
अलीकडच्या काळातील कपिल देव यांच्या काही वक्तव्यांवरुन वादही निर्माण झाला होता. कपिल देव यांना सध्याच्या क्रिकेटमध्ये काही गोष्टी पटत नाहीत. त्याबद्दल ते सतत आपली रोखठोक भूमिका मांडत असतात.
Kapil Dev Statement : भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचे कर्णधार कपिल देव स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अनेक विषयांवर ते स्पष्टपणे आपली मत मांडतात. अनेकदा ते कठोर शब्दांचा वापर करतात. अलीकडच्या काळातील कपिल देव यांच्या काही वक्तव्यांवरुन वादही निर्माण झाला होता. कपिल देव यांना सध्याच्या क्रिकेटमध्ये काही गोष्टी पटत नाहीत. त्याबद्दल ते सतत आपली रोखठोक भूमिका मांडत असतात. कपिल देव स्वत: शिस्तबद्ध खेळाडू होते. क्रिकेट खेळताना फिटनेस राखण्यासाठी त्यांनी स्वत:वर बरीच मेहनत घेतली. आता ते विश्लेषकाच्या भूमिकेत असतात. आता कपिल देव यांच्या एका वक्तव्यावरुन खळबळ उडाली आहे.
कपिल देव यांनी कोणाबद्दल वक्तव्य केलं?
कपिल देव हे टीम इंडियाच्या एका खेळाडूवर भडकले आहेत. मी त्याच्या कानाखाली वाजवणार आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं. कपिल देव यांच्या या वक्तव्यावर अनेकजण हैराण आहेत. कपिल देव यांच हे वक्तव्य आक्रमक वाटत असलं, तरी त्यामागे काळजीची, आपुलकीची भावना आहे. कपिल देव यांनी टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतबद्दल हे वक्तव्य केलय.
कपिल देव यांच्या वक्तव्याची चर्चा
कपिल देव यांच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे. त्यांनी टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतबद्दल प्रतिक्रिया देताना हे म्हटलं. एका वृत्तवाहिनीवर ते बोलत होते. “ऋषभ पंत लवकर बरा व्हावा, अशी माझी इच्छा आहे. ऋषभ पंत बरा होईल, तेव्हा मी जाऊन त्याच्या कानाखाली मारणार आहे. ऋषभने स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. त्याला मी सांगणार, बघं तुझ्या दुखापतीमुळे सगळ्या टीमच कॉम्बिनेशन बिघडलय. आजची तरुण मुलं अशा चूका कशी करतात? त्याचा रागही येतो. त्यासाठी कानाखाली मारावी लागेल” असं कपिल देव म्हणाले. टीम इंडियाच मोठं नुकसान
कपिल देव आधी रागावून बोलले, नंतर म्हणाले की, “ऋषभ पंतला माझा आशिर्वाद आहे. देवाच्या कृपेने त्याला चांगलं स्वास्थ लाभो” भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये उद्यापासून टेस्ट सीरीज सुरु होत आहे. नागपूरमध्ये पहिला कसोटी सामना होणार आहे. ऋषभ पंतच टीममध्ये नसणं हा टीम इंडियासाठी एक फटका आहे. यामुळे टीम इंडियाच नुकसान होणार आहे. ऋषभ पंत टेस्टसाठी अव्वल खेळाडू आहे. विकेटकीपिंग बरोबर तो उत्तम बॅट्समनही आहे. ऋषभ पंत कसोटीमध्ये वेगाने धावा करतो. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरीजमध्ये त्याने याआधी जबरदस्त प्रदर्शन केलं होतं.