IPL 2022: टेनिस क्रिकेटचा ‘बादशाह’ प्रवीण तांबेला द्रविड ग्रेट का वाटतात? त्याने सांगितलेला ‘हा’ किस्सा एकदा वाचा

kaun pravin tambe: भारतीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविड (Rahul dravid) यांच्यापेक्षा जास्त आदर असलेला खेळाडू अभावानेच आढळेल. भारतीय संघासाठी खेळताना राहुल द्रविड हे परफेक्ट टीम मॅन होते.

IPL 2022: टेनिस क्रिकेटचा ‘बादशाह’ प्रवीण तांबेला द्रविड ग्रेट का वाटतात? त्याने सांगितलेला 'हा' किस्सा एकदा वाचा
IPL 2022: प्रवीण तांबे-राहुल द्रविड Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 4:36 PM

मुंबई: भारतीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविड (Rahul dravid) यांच्यापेक्षा जास्त आदर असलेला खेळाडू अभावानेच आढळेल. भारतीय संघासाठी खेळताना राहुल द्रविड हे परफेक्ट टीम मॅन होते. म्हणजे संघासाठी कुठलीही जबाबदारी निभावण्यासाठी ते नेहमी सज्ज असायचे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही राहुल द्रविड यांनी आपल्या कृतीतून अनेकांची मन जिंकून घेतली. निवृत्तीनंतरही द्रविड यांनी इंडिया ए (India A) आणि अंडर 19 टीमचे प्रशिक्षकपद भुषवून भारतीय क्रिकेटला मोलाचं योगदान दिलं. राहुल द्रविड यांची क्रिकेटच्या मैदानावरील कामगिरी आणि त्यांचं शांत-संयमी व्यक्तीमत्त्व यामुळे आजही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती त्यांचा आदर करते. राहुल द्रविड यांनी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावली. त्यावेळी त्यांनी काही रत्न शोधली. प्रवीण तांबे त्यापैकीच एक. लेग स्पिन गोलंदाजी करणाऱ्या प्रवीणने वयाच्या 41 व्या वर्षी आयपीएलमध्ये डेब्यु केला. तांबेने आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक घेतली. लवकरच त्याचा बायोपिक रिलीज होणार आहे.

‘आज मी जे काही आहे, ते…’

“माझ्या प्रवासात राहुल द्रविड यांची खूप महत्त्वाची भूमिका आहे. आज मी जे काही आहे, ते त्यांच्यामुळेच. दोन ते तीन दिवसांची जी माझी चाचणी झाली, त्यावेळी त्यांनी एकदाही माझं वय विचारलं नाही. त्यांनी फक्त माझी कामगिरी बघितली आणि माझी निवड केली. ती त्यांची सर्वात मोठी गोष्ट आहे” असं प्रवीण तांबे स्पोर्ट्सकीडाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं असावं

“राहुल द्रविड यांना माझ्या वयाबद्दल समजलं, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं असावं. प्रवीण तुझं वय माहित नसताना, मी तुला निवडलं. मी पेपर बघितले, तेव्हा मला समजलं तू 41 वर्षांचा आहेस. पण त्याने फरक पडत नाही, असं सांगून ते हसले, यातून त्यांचं वेगळेपण दिसतं” असं प्रवीणने सांगितलं.

मध्यमवर्गीय कुटुंबातील मराठी मुलाचा संघर्षमय प्रवास

लवकरच प्रवीण तांबेच्या आयुष्यावर आधारीत ‘कौन प्रवीण तांबे’ चित्रपट रिलीज होणार आहे. ‘ज्यादा सोच मत, जहा सोचा वही लोचा’, अशा काही डायलॉग्समुळे या चित्रपटाचा प्रोमो लक्षवेधी ठरला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवातच राहुल द्रविड यांच्यापासून झाली आहे. मुंबईच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाने वयाच्या चाळीशीत आयपीएल, रणजीपर्यंतचा केलेला प्रवास यामध्ये दाखवण्यात आला आहे. प्रवीण तांबे हे मुंबईच्या टेनिस क्रिकेटमधलं एक मोठ नाव आहे. टेनिस क्रिकेटमध्ये प्रवीण तांबे या लेग स्पिनरचा एक दबदबा होता. सीजन क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख मिळवण्यासाठी त्याने काय संघर्ष केला, ते चित्रपटातून मांडण्यात आलं आहे. श्रेयस तळपदे या चित्रपटात प्रवीण तांबे यांची भूमिका साकारतोय.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.