IPL 2023 : तेवढं मन मोठं लागतं! रिंकूने 5 सिक्स मारलेल्या गुजरातच्या बॉलरसाठी शाहरूखच्या केकेआरचं खास ट्विट
एका बॉलरसाठी हा मोठा आघात असल्यासारखं आहे. त्याच्या मानसिकतेवरही परिणाम झालेला पाहायला मिळतो. याच पार्श्वभूमीवर केकेआरने यशसाठी एक खास ट्विट केलं आहे.
मुंबई : गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील झालेला सामन्याची आयपीएलच्या इतिहासात नोंद झाली आहे. रिंकू सिंग याने मारलेले 5 सिक्स प्रत्येकाच्या कायम आठवणीत राहणारे आहेत. क्रिकेट जगतात प्रत्येकाने रिंकूवर कौतुकाची थाप टाकली. पठ्ठ्याने कारनामाच तसा केलाय, संघाला शेवटच्या ओव्हरमध्ये 29 धावांची आवश्यकता असताना सलग 5 सिक्स मारले. सर्वांना रिंकू दिसला मात्र ज्या बॉलरल त्याने हे पाच सिक्स मारलो तो यश दयाळ हा युवा भारतीय बॉलर आहे. एका बॉलरसाठी हा मोठा आघात असल्यासारखं आहे. त्याच्या मानसिकतेवरही परिणाम झालेला पाहायला मिळतो. याच पार्श्वभूमीवर केकेआरने यशसाठी एक खास ट्विट केलं आहे.
केकेआरने केलेलं ट्विट-
चिन अप लाड, मैदानातील तो एक दिवस फक्त कठीण होता, सर्वोत्कृष्ट खेळाडूंसोबत असं झालेलं पाहायला मिळतं. तू चॅम्पियन आहेस यश आणि जोरदार पुनरागमन करणार आहे, असं म्हणत केकेआरने ट्विट करत यशचा आत्मविश्वास वाढवला आहे.
Chin up, lad. Just a hard day at the office, happens to the best of players in cricket. You’re a champion, Yash, and you’re gonna come back strong ??@gujarat_titans pic.twitter.com/M0aOQEtlsx
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 9, 2023
यश युवा खेळाडू असल्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणनेही ट्विट केलं आहे. अरे मित्रा यश, पुढील सामन्यात तुला चांगलं करण्यासाठी आज जे काही झालं ते सर्व विसरून जा. तुझा स्वतःचा आत्मविश्वास मजबूत असेल तर तू कोणत्याही परिस्थितीमध्ये स्ट्राँग राहू शकतोस, असं पठाणने म्हटलं आहे.
क्रिकेटचा इतिहास पाहिला तर याआधी स्टार खेळाडूंना अशा परिस्थितीचा सामना करावा लागला होता. टी- 20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचा स्टार बॉलर स्टुअर्ड ब्रॉड याला युवराज सिंहने सलग सहा सिक्सर मारले होते. मात्र आताच्या सर्वोत्कृष्ट कसोटी बॉलरमध्ये ब्रॉडचा समावेश आहे.
दरम्यान, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स यालाही 2016 च्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये कार्लोस ब्रेथवेट याने फायनल मध्ये सलग चार सिक्सर मारले होते. मात्र त्यानंतर स्टोक्सने जबरदस्त पुनरागनमन करत 2019 चा वर्ल्डकप इंग्लंडला जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती.