KKR vs LSG IPL 2022: KL Rahul चा शुन्यावरच खेळ संपवणारा श्रेयस अय्यरचा बुलेट थ्रो एकदा पहाच VIDEO
KKR vs LSG IPL 2022: टिम साउदी पहिली ओव्हर टाकत होता. या षटकातील पाचवा चेंडू क्विंटन डि कॉकने पुश केला. क्विंटनचा कॉल असल्यामुळे राहुल चोरटी धाव घेण्यासाठी पळाला.
मुंबई: लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow super Giants) कॅप्टन के.एल.राहुल (KL Rahul) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पण आज त्याच काही चाललं नाही. याच कारण आहे, कोलकाता नाइट रायडर्सचा कॅप्टन श्रेयस अय्यर. श्रेयस अय्यरने (Shreyas iyer) आज जबरदस्त फिल्डिंगचा नमुना दाखवला. त्यामुळे केएल राहुलला भोपळाही फोडता आला नाही. पहिल्याच ओव्हरमध्ये केएल राहुलचा खेळ संपला व त्याला तंबूत परताव लागलं. राहुल खेळपट्टीवर उभ राहिल्यानंतर लखनौला नेहमीच चांगली सुरुवात मिळाली आहे. पण आज राहुल लवकर बाद झाला म्हणून फरक पडला नाही. दुसरा सलामीवीर क्विंटन डि कॉकने ती जबाबदारी निभावली. त्याने 29 चेंडूत 50 धावा फटकावल्या. यात चार चौकार आणि तीन षटकार होते. राहुल आऊट झाल्यानंतर डि कॉकने ऑलराऊंडर दीपक हुड्डाच्या साथीने डाव सावरला. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली.
शुन्यावरच खेळ संपवला
टिम साउदी पहिली ओव्हर टाकत होता. या षटकातील पाचवा चेंडू क्विंटन डि कॉकने पुश केला. क्विंटनचा कॉल असल्यामुळे राहुल चोरटी धाव घेण्यासाठी पळाला. पण खेळपट्टीवर निम्म्यापर्यंत गेल्यानंतर शॉर्ट एक्स्ट्राकव्हर्समध्ये उभा असलेला श्रेयस अय्यर विद्युत वेगाने चेंडूच्या दिशेने झेपावला. ते पाहून डि कॉकने माघार घेतली. राहुलही क्रीझच्या दिशेने माघारी फिरला. पण श्रेयस अय्यरने नॉन स्ट्राइकच्या दिशेने केलेल्या बुलेट थ्रो ने त्याचा शुन्यावरच खेळ संपवला.
KL Rahul चा शुन्यावर खेळ संपवणारा श्रेयस अय्यरचा बुलेट थ्रो एकदा इथे क्लिक करुन पहाच VIDEO
आजचा सामना लखनौपेक्षा पण केकेआरसाठी जास्त महत्त्वाचा
आजच्या सामन्यात उमेश यादव दुखापतीमुळे खेळत नाहीय. त्याच्याजागी केकेआरने हर्षित राणाला संधी दिली आहे. केकेआरला आजच्या सामन्यातगी विजय आवश्यक आहे. कारण पॉइंटस टेबलमध्ये केकेआरचा संघ 10 सामन्यात चार विजय आणि सहा पराभवासह आठव्या स्थानावर आहे. प्लेऑफचं आव्हान टिकवून ठेवण्य़ासाठी केकेआरला विजय मिळवणं आवश्यकच आहे. लखनौची टीम 14 पॉइंटसह दुसऱ्या स्थानावर आहे. प्लेऑफच्या ते उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे आजचा सामना लखनौपेक्षा पण केकेआरसाठी जास्त महत्त्वाचा आहे.