AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs PBK IPL 2023 : KKR साठी पुन्हा हिरो बनला रिंकू सिंह….

KKR vs PBK IPL 2023 : शेवटच्या चेंडूवर रिंकू सिंहने आपल्या टीमला विजय मिळवून दिला. केकेआरची प्लेऑफची आशा कायम आहे. 15 सीजनमध्ये चेस करताना कोलकाता नाइट रायडर्सने फक्त एकदाच लास्ट बॉलवर विजय मिळवला होता.

KKR vs PBK IPL 2023 : KKR साठी पुन्हा हिरो बनला रिंकू सिंह....
रिंकू सिंह याने केकेआर टीमला गुजरात टायटन्स विरुद्ध अशक्य असा विजय मिळवून दिला. रिंकूने 5 बॉलमध्ये 5 सिक्स ठोकून सनसनाटी विजय मिळवून दिला. रिंकून गुजरातच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिसकावून घेतला.
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 11:12 AM

कोलकाता : कोलकाता नाइट रायडर्ससाठी पुन्हा एकदा रिंकू सिंहने आपल्या खास अंदाजात मॅच फिनिश केली. आयपीएलच्या 16 व्या सीजनमध्ये सोमवारी रात्री केकेआर आणि पंजाब किंग्समध्ये सामना झाला. शेवटच्या चेंडूवर केकेआरला विजयासाठी 2 रन्सची गरज होती. दबावाचा स्थिती होती. समोर अर्शदीप सिंगसारखा अनुभवी गोलंदाज होता. त्यावेळी रिंकू सिंहने कुठलीही चूक केली नाही. अर्शदीप सारख्या गोलंदाजाने टाकेलल्या चेंडूवर थेट चौकार ठोकला. अशा प्रकारे रिंकूने केकेआरला विजय मिळवून दिला.

पंजाबच्या 180 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना केकेआरकडून नितीश राणाने (51), आंद्रे रसेल (42) आणि जेसन रॉयने (38) धावा केल्या. केकेआरने लास्ट बॉलवर विजय मिळवला. त्यांनी 5 बाद 182 धावा केल्या. या मॅचच्या विजयाचा खरा हिरो रिंकू सिंह ठरला. त्याने 10 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या.

तोच टीमचा खरा संकट मोचक

15 सीजनमध्ये चेस करताना कोलकाता नाइट रायडर्सने फक्त एकदाच लास्ट बॉलवर विजय मिळवलाय. या सीजनमध्ये दोनदा असा करिश्मा झालाय. महत्वाच म्हणजे दोन्हीवेळा रिंकू सिंह क्रीजवर होता. दबावाच्या क्षणात त्याने टीमला विजय मिळवून दिला. रिंकू खऱ्या अर्थाने कोलकाता नाइट रायडर्सचा संकटमोचक आहे. अजूनही कोलकात्याला आशा

या विजयासह केकेआरचे 10 मॅचमध्ये 10 पॉइंट्स झालेत. पंजाब किंग्सेच सुद्धा इतकेच पॉइंट झालेत. केकेआरची टीम पाचव्या आणि पंजाब किंग्सची टीम सातव्या नंबरवर आहे. केकेआर लास्ट पाच ओव्हर्समध्ये विजयासाठी 58 धावांची गरज होती. शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये 26 धावा हव्या होत्या. आंद्रे रसेलने आयपीएल इतिहासातील महागडा खेळाडू सॅम करनला 19 व्या ओव्हरमध्ये तीन सिक्स मारले. टीमला लास्ट ओव्हरमध्ये 6 धावा हव्या होत्या. पाचव्या चेंडूवर आंद्रे रसेल रनआऊट झाला. लास्ट बॉलवर 2 रन्सची गरज होती. त्यावेळी रिंकूने टीमला विजय मिळवून दिला.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.