KL Rahul-Athiya ला विराटने गिफ्ट केली खास कार, किंमत ऐकून विस्फारतील डोळे
KL Rahul Athiya Wedding gifts :आता केएल राहुल आणि अथिया शेट्टीला लग्नामध्ये कोणी काय गिफ्ट दिलं? त्याची चर्चा आहे. केएल राहुल हे क्रिकेट विश्वातील तर सुनील शेट्टी हे बॉलिवूडमधलं मोठ नाव आहे.
KL Rahul Athiya Wedding gifts : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू केएल राहुल आणि अभिनेत्री आथिया शेट्टी 23 जानेवारीला विवाहबद्ध झाले. अभिनेता सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्महाऊसवर निवडक नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. आथिया अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे. मागच्या दोन-तीन वर्षांपासून आथिया आणि केएल राहुलच्या प्रेमसंबंधांची चर्चा होती. अखेर दोन दिवसांपूर्वी दोघे विवाहबद्ध झाले. या दोघांच्या विवााहाची मीडियामध्ये बरीच चर्चा झाली. लग्नाचं स्थळ, मेन्यू, कोण सेलिब्रिटी, स्टार्स येणार त्याबद्दल बरच लिहिलं गेलं. अखेर दोन दिवसांपूर्वी हे लग्न पार पडलं.
लग्नामध्ये कोणी काय गिफ्ट दिलं?
आता केएल राहुल आणि अथिया शेट्टीला लग्नामध्ये कोणी काय गिफ्ट दिलं? त्याची चर्चा आहे. केएल राहुल हे क्रिकेट विश्वातील तर सुनील शेट्टी हे बॉलिवूडमधलं मोठ नाव आहे. दोघांच स्टेटस लक्षात घेता, त्यांना येणारे गिफ्टस देखील तितकेच खास आहेत.
धोनीने काय दिलं?
सध्या न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीज सुरु आहे. टीम इंडियाचे खेळाडू या मालिकेत व्यस्त आहेत. त्यामुळे ते राहुलच्या लग्नला येऊ शकले नाहीत. पण राहुलचा टीममधील जवळचा मित्र विराट कोहलीने त्याला गिफ्ट आठवणीने पाठलं. फक्त विराटच नाही, तर टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीने सुद्धा त्याला खास गिफ्ट पाठवलं.
विराटने गिफ्ट केलेल्या कारची किंमत काय?
आता प्रश्न हा आहे की, धोनी-विराटने राहुलला काय गिफ्ट दिलं?. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनी आणि विराटने आपल्या पसंतीचे गिफ्टस केएल राहुल आणि त्याची पत्नी आथिया शेट्टीला पाठवलेत. रिपोर्ट्नुसार विराट कोहलीने राहुल-आथिया जोडीला आलिशान BMW कार गिफ्ट केलीय. या कारची किंमत 2.17 कोटीच्या घरात आहे. धोनीच्या गिफ्टची किंमत लाखाच्या घरात
केएल राहुल आणि आथिया शेट्टीच्या लग्नाला महेंद्र सिंह धोनी सुद्धा पोहोचला. लग्नाला उपस्थित राहून त्याने वधू-वरांना आशिर्वाद दिलाच. पण त्याचबरोबर धोनीने त्याला विशेष प्रिय असलेली वस्तू राहुलला गिफ्टमध्ये दिली. धोनीला बाईक विशेष आवडतात. त्याने राहुलला कावासकी निंजा बाइक गिफ्ट केली. मार्केट वॅल्युच्या हिशोबाने या बाईकची किंमत 80 लाख रुपये आहे.