IND vs SA 2nd T20: Suryakumar Yadav वर अन्याय? केएल राहुलपेक्षा सरस खेळला, पण….
IND vs SA 2nd T20: कालच्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादववर अन्याय झालाय असं अनेकांना वाटतय, कारणं....
मुंबई: गुवाहाटीमध्ये दुसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 16 धावांनी विजय मिळवला. मायदेशात टीम इंडियाने प्रथमच दक्षिण आफ्रिकेवर टी 20 सीरीजमध्ये विजय मिळवला. टीम इंडियाने पहिली बॅटिंग करताना 237 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या टीमने 221 धावा केल्या. टीम इंडियाच्या या विजयात सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि विराट कोहली शानदार इनिंग खेळले.
सूर्यकुमार यादववर अन्याय झाला
सामन्यानंतर जे झालं, ते क्रिकेटच्या मैदानात फार कमी पहायला मिळतं. अवॉर्ड सेरेमनीमध्ये सूर्यकुमार यादववर अन्याय झाला. अवघ्या 22 चेंडूत 61 धावांची जबरदस्त इनिंग खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला नाही. हा पुरस्कार केएल राहुलला मिळाला.
राहुलला वाटलं आश्चर्य
पुरस्कार स्वीकारल्यानंतर खुद्द केएल राहुलला स्वत:ला आश्चर्य वाटलं. हा पुरस्कार मला मिळाल्याचं आश्चर्य वाटतय असं राहुल म्हणाला. “खरंतर हा पुरस्कार सूर्यकुमार यादवला मिळायला पाहिजे होता. तो प्रभावशाली इनिंग खेळला” असं राहुल स्वत: म्हणाला.
सूर्यकुमारची कामगिरी राहुलपेक्षा उत्तम
केएल राहुलने 28 चेंडूत 57 धावा फटकावल्या. यात 5 चौकार आणि 4 षटकार लगावले. सूर्यकुमारने 22 चेंडूत 61 धावा चोपल्या. त्याने 5 सिक्स आणि 5 फोर मारले. त्याचा स्ट्राइक रेट 242.86 चा होता.
प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड कोण देतं?
प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड सामनाधिकारी आणि कधी कधी टीव्ही ब्रॉडकास्टर्स ठरवतात. प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार व्होटसवरुनही ठरतो. हा पुरस्कार फक्त जास्त धावा किंवा विकेट घेण्यासाठी दिला जात नाही. यात खेळाडूच्या प्रदर्शनाशिवाय प्लेइंग कंडिशनही पाहिली जाते. कदाचित एक्टपर्ट्सना परिस्थितीनुसार, केएल राहुलची इनिंग जास्त चांगली वाटली असावी.
सूर्यकुमारने दाखवली कमाल
प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड भले केएल राहुलला मिळाला असेल. पण मिडल ओव्हर्समध्ये सूर्यकुमार यादवने मॅचची दिशाच पलटून टाकली. त्याने कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी आणि वेन पार्नेल सारख्या गोलंदाजांची धुलाई केली. सूर्यकुमार चहूबाजूला फटकेबाजी केली.