IPL 2022 Auction: महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंवर कोलकात्याची नजर, महालिलावात पर्स रिकामी करण्यास तयार?

आयपीएलच्या गेल्या मोसमात अंतिम फेरीत पोहोचलेल्या कोलकात्याच्या संघाने जेतेपदासाठीच्या सामन्यात चेन्नईकडून पराभव स्वीकारला होता, पण यावेळी त्यांना संघात कोणतीही कमतरता नको आहे आणि त्यासाठी त्यांना महा लिलावात उत्तमोत्तम खेळाडू विकत घ्यावे लागतील जे त्यांना चॅम्पियन बनवतील.

IPL 2022 Auction: महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंवर कोलकात्याची नजर, महालिलावात पर्स रिकामी करण्यास तयार?
Kolkata Knight Riders TeamImage Credit source: social
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 5:07 PM

मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) चा महालिलाव (Mega Auction) 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत सर्व 10 फ्रँचायझींचे डोळे आता बंगळुरुकडे लागले आहेत, जिथे 590 खेळाडूंच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. 2 वेळा आयपीएल चॅम्पियन संघ असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) या महालिलावासाठी जोरदार तयारी केली आहे. एका अंदाजानुसार कोलकाता नाईट रायडर्स हा संघ महाराष्ट्राच्या 2 स्टार खेळाडूंना खरेदी करण्यासाठी अग्रही असेल. कारण ते खेळाडू त्यांच्या संघासाठी परफेक्ट असतील. आपल्या संघाला पूर्वीप्रमाणे मजबूत संघ म्हणून मैदानात उतरवण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सचे संघमालक अनेक तगड्या खेळाडूंवर लक्ष केंद्रित करतील.

आयपीएलच्या गेल्या मोसमात अंतिम फेरीत पोहोचलेल्या कोलकात्याच्या संघाने जेतेपदासाठीच्या सामन्यात चेन्नईकडून पराभव स्वीकारला होता, पण यावेळी त्यांना संघात कोणतीही कमतरता नको आहे आणि त्यासाठी त्यांना महा लिलावात उत्तमोत्तम खेळाडू विकत घ्यावे लागतील जे त्यांना चॅम्पियन बनवतील. कोलकाता नाईट रायडर्सने 4 खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे जे त्यांच्या संघाचा आधारस्तंभ आहेत. संघाने अष्टपैलू आंद्रे रसेल, फिरकीपटू वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण आणि अष्टपैलू व्यंकटेश अय्यर यांना रिटेन केले आहे.

याव्यतिरिक्त संघमालक अजून तीन-चार मॅचविनर खेळाडू संघात यावेत, यासाठी प्रयत्नशील असतील. त्यातही प्रामुख्याने त्यांना दोन असे खेळाडू हवे आहेत, जे त्यांच्यासाठी सामने जिंकून देतील. तसेच केकेआरला एक चांगला कर्णधारदेखील हवा आहे. लिलावाच्या वेळी या गोष्टींचा विचार करुनच केकेआरचे संघमालक खेळाडूंवर बोली लावतील. त्यामुळे केकेआरची नजरा महाराष्ट्रातल्या दोन खेळाडूंवर असेल. ते खेळाडू म्हणजे श्रेयस अय्यर आणि राहुल त्रिपाठी. देशांतर्गत क्रिकेटमध्ये श्रेयस मुंबईचा शिलेदार आहे. तर राहुल त्रिपाठी महाराष्ट्राचा उपकर्णधार आहे. या दोन खेळाडूंवर केकेआरची नजर असेल.

कोलकात्याला श्रेयससारख्या खेळाडूची गरज

श्रेयस अय्यर हे नाव महा लिलावात कोलकाता नाईट रायडर्सच्या रडारवर नक्कीच असेल. उजव्या हाताचा फलंदाज श्रेयस अय्यरने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले आहे, गेल्या वर्षी त्याच्या जागी पंतकडे दिल्लीची कमान सोपवण्यात आली होती. तसेच, अय्यरला दिल्लीने रिटेन केले नाही. तसेच लखनौ-अहमदाबाद या नवीन संघांनीही त्याला कर्णधार बनवले नाही. या सर्व गोष्टी कोलकाताच्या बाजूने गेल्या आहेत कारण हा संघ कर्णधाराच्या शोधात आहे. गेल्या मोसमात कोलकाताने ऑईन मॉर्गनला कर्णधार बनवले होते. मॉर्गन फॉर्मात नसल्यामुळे कोलकात्याच्या संघाला मोठा फटका सहन करावा लागला. तसेच यावेळी कोलकात्याला कोणत्याही परिस्थितीत भारतीय खेळाडूला कर्णधार बनवायचे आहे आणि त्यांना श्रेयस अय्यरपेक्षा चांगला पर्याय मिळणार नाही. अय्यरने आयपीएलमध्ये 87 सामन्यांत 31.66 च्या सरासरीने 2375 धावा केल्या आहेत. अय्यर हा क्रमांक 3 आणि क्रमांक 4 वर सर्वोत्तम फलंदाज आहे, ज्याच्याकडे KKR साठी सामने जिंकण्याची ताकद आहे. तसेच 2020 च्या आयपीएलमध्ये त्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीने अंतिम फेरी गाठली होती.

मधल्या फळीत राहुल त्रिपाठीसारखा मॅचविनर हवा

कोलकाता फ्रँचायझी त्यांच्या एका खेळाडूला संघात परत घेण्यास उत्सूक आहे. आम्ही त्यांच्या मधल्या फळीतला खेळाडू राहुल त्रिपाठीबद्दल बोलत आहोत. राहुलने गेल्या मोसमात कोलकात्यासाठी 28 पेक्षा जास्त सरासरीने 397 धावा फटकावल्या होत्या. राहुल त्रिपाठी हा कोलकात्यासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे. त्याने अनेकदा कोलकात्यासाठी मॅचविनिंग खेळी साकारल्या आहेत. कोलकात्याचा संघमालक शाहरुख खाननेदेखील अनेकदा राहुलचं कौतुक केलं आहे. त्यामुळे केकेआर पुन्हा एकदा राहुल त्रिपाठीचा संघात समावेश करू शकतो, असे मानले जात आहे.

इतर बातम्या

Under 19 World cup: ‘हे’ आहेत वर्ल्डकप गाजवणारे महाराष्ट्राचे चार खेळाडू, गरज असताना मुंबई-पुणेकरांचा जबरदस्त परफॉर्मन्स

IND vs WI: सुर्य कुमार यादवला भडकवणारा तो जोडीदार कोण? मागच्या मॅचमध्ये काय झालं?

तालिबानची दहशत! अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ, U19 World Cup टीममधले चौघे मायदेशी परतलेच नाहीत

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.