IPL 2022, MI vs KKR : आज MI विरुद्ध KKR सामना, अशी असेल मुंबई इंडियन्सची Playing 11
मुंबई इंडियन्स पॉईट्स टेबलमध्ये सर्वात खाली आहे. एकूण 10 सामने मुंबई इंडियन्सने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना फक्त 2 सामन्यात जिंकता आले आहे.
मुंबई : आज आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) सामना होणार आहे. हा सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्यापूर्वी संध्याकाळी सात वाजता टॉस होईल. पॉईंट्स टेबलचा विचार केल्यास मुंबई इंडियन्स पॉईट्स टेबलमध्ये सर्वात खाली आहे. एकूण 10 सामने मुंबई इंडियन्सने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना फक्त 2 सामने जिंकता आलंय. तर उर्वरीत 8 सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागलाय. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्सला एकूण 4 गुण मिळाले आहेत. त्यांचा नेट रेट -0.725 इतका आहे. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सचा विचार केल्यास केकेआर पॉईंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी आहे. कोलकाताने एकूण 11 सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना 4 सामन्यात यश आलंय. तर 7 सामन्यात केकेआरला पराभवाचा सामना करावा लागलाय. कोलकाता नाईट रायडर्सचा नेट रेट -0.304 इतका आहे. केकेआरला पॉईट्स टेबलमध्ये एकूण 8 गुण मिळाले आहेत. त्यामुळे आजचा सामना रंजक असणार असून कोण बाजी मारणार, हे पाहणं महत्वाचं ठरेल.
जाणून घ्या दोन्ही संघाचे प्लेइंग इलेवन
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन: इशान किशन, रोहित शर्मा (क), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, किरॉन पोलार्ड, फॅबियन ऍलन, डॅनियल सॅम्स, जयदेव उनाडकट, जसप्रीत बुमराह, बेसिल थंपी
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन – आरोन फिंच, बाबा इंद्रजीत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (क), नितीश राणा, रिंकू सिंग, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, सुनील नरेन, टीम साऊदी, शिवम मावी आणि हर्षित राणा.
पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई कुठे?
पॉईंट्स टेबलचा विचार केल्यास मुंबई इंडियन्स पॉईट्स टेबलमध्ये सर्वात खाली आहे. एकूण 10 सामने मुंबई इंडियन्सने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना फक्त 2 सामन्यात जिंकता आले आहे. तर उर्वरीत 8 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्सला एकूण 4 गुण मिळाले आहेत. त्यांचा नेट रेट -0.725 इतका आहे.
पॉईंट्स टेबलमध्ये कोलकाता कुठे?
कोलकाता नाईट रायडर्सचा विचार केल्यास केकेआर पॉईंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी आहे. कोलकाताने एकूण 11 सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना 4 सामन्यात यश आलंय. तर 7 सामन्यात केकेआरला पराभवाचा सामना करावा लागलाय. कोलकाता नाईट रायडर्सचा नेट रेट -0.304 इतका आहे. केकेआरला पॉईट्स टेबलमध्ये एकूण 8 गुण मिळाले आहेत.