पंड्या ब्रदर्सच्या घरी आनंद, Krunal Pandya ‘बाबा’ बनला, तर हार्दिक पंड्या ‘काका’
पंड्या ब्रदर्सच्या घरात आनंदाचं वातावरण आहे. क्रुणाल पंड्या (Krunal pandya) बाबा बनला आहे. हार्दिक पंड्याप्रमाणे तो ही एका मुलाचा पिता झाला आहे.
नवी दिल्ली: पंड्या ब्रदर्सच्या घरात आनंदाचं वातावरण आहे. क्रुणाल पंड्या (Krunal pandya) बाबा बनला आहे. हार्दिक पंड्याप्रमाणे तो ही एका मुलाचा पिता झाला आहे, क्रुणाल पंड्या बाबा बनला याचा अर्थ हार्दिक पंड्याचही (Hardik pandya) प्रमोशन झालं आहे. क्रुणाल बाबा, तर हार्दिक पंड्या काका बनला आहे. क्रुणाल पंड्याने बाबा बनल्याचा आनंद सोशल मीडियावर (Social Media) शेयर केलाय. त्याने पत्नी आणि मुलासोबतचा फोटो शेयर केलाय. पहिल्या फोटो मध्ये क्रुणाल आपल्या बाळाला बघतोय, तर दुसऱ्याफोटोत तो त्याचं चुंबन घेताना दिसतो.
झहीरच्या पत्नीने दिल्या शुभेच्छा
क्रुणाल पंड्या बाबा झाल्याचं समजताच सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या जात आहेत. क्रुणालला शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये पंड्या ब्रदर्सचे फॅन्स आहेतच, पण काही क्रिकेटर्सही आहेत. झहीर खानच्या पत्नीने क्रुणाल आणि त्याच्या बायकोला आई-बाबा बनल्याच्या खास शब्दात शुभेच्छा दिल्या.
मोहसीनकडून क्रुणालला शुभेच्छा
क्रिकेट जगतातून क्रुणाल पंड्याला शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये मोहसीन खान आहे. मोहसीन खान आणि क्रुणाल पंड्या आयपीएल मध्ये एकाच संघासाठी लखनौ सुपर जायट्ंससाठी खेळतात. ‘मुबारकबाद भइया’ असं मोहसीनने आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
View this post on Instagram
क्रुणालने मुलाचं नाव जाहीर केलं
सोशल मीडियावर पत्नी आणि मुलासोबतचा फोटो शेयर करताना क्रुणाल पंड्याने घरी आलेल्या चिमुकल्याच नाव काय ठेवलं, ते सुद्धा जाहीर केलय. कवीर क्रुणाल पंड्या असं मुलाचं नाव आहे. क्रुणाल पंड्या आयपीएलमुळे हिट आहे. टीम इंडियापासून अजूनही तो लांब आहे. पण मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना त्याने नेहमीच दमदार कामगिरी केली आहे. हार्दिक पंड्या सध्या टॉपवर आहे. भविष्यातील कॅप्टन म्हणूनही हार्दिक पंड्याकडे पाहिलं जातय. हार्दिकला वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे सीरीजसाठी आराम दिलाय. पण वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 सीरीजमध्ये तो खेळताना दिसेल.