IPL 2022, Purple Cap : पर्पल कॅपमध्ये कुलदीपची आगेकूच, उमरान मलिकला धक्का, तुमचा आवडता खेळाडू नेमका कुठे? जाणून घ्या…
पर्पल कॅपमधील चौथ्या स्थानी असलेल्या उमरान मलिकला धक्का देत कुलदीप यादवने आगेकूच केली आहे.
मुंबई: दरवर्षी आयपीएल (IPL 2022) स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे (Purple Cap) क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. काल मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना झाला. या एका महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) वर विजय मिळवला. मुंबईने दिल्लीवर पाच विकेट राखून विजय मिळवला. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना रंगला होता. रमणदीप सिंहने चौकार ठोकून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. मुंबई इंडियन्सच्या कालच्या विजयाचा नायक पुन्हा एकदा टिम डेविड आहे. टिम डेविडने केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईला हा विजय मिळवता आला. टिम डेविडने 11 चेंडूत 34 धावा फटकावल्या. यात दोन चौकार आणि चार षटकार होते. मुंबईच्या विजयामुळे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा संघ प्लेऑफमध्ये दाखल झालाय. दिल्लीचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलय. दिल्लीने विजयासाठी 160 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मुंबईने 19.1 षटकात हे लक्ष्य पार केलं. सामना रोमांचक स्थिती मध्ये असताना टिम डेविड आला. त्याने फटकेबाजी केली व सर्व गणितचं बदलून टाकलं. दरम्यान, कालच्या सामन्यानंतर पर्पल कॅपच्या यादीत काय बदल झालाय पाहुया…
पर्पल कॅपचा मानकरी कोण?
पर्पल कॅपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर युझवेंद्र चहल आहे. त्याने सर्वाधिक 26 विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत. दुसऱ्या स्थानी वानिंदू हसरंगा आहे. त्याने 24 विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या स्थानी कगिसो रबाडा आहे. त्याने 22 विकेट घेतल्या आहेत. तर चौथ्या स्थानी असलेल्या उमरान मलिकला धक्का देत कुलदीप यादवने आगेकूच केली आहे. कुलदीने 21 विकेट घेतल्या आहेत. तर उमरान मलिक हा पाचव्या स्थानी गेला असून त्यानेही 21 विकेट घेतल्या आहेत.
पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच गोलंदाज
गोलंदाज | विकेट | दिलेल्या धावा |
---|---|---|
युझवेंद्र चहल | 26 | 462 |
वानिंदू हसरंगा | 24 | 362 |
कागिसो रबाडा | 23 | 406 |
उमरान मलिक | 22 | 444 |
कुलदीप यादव | 21 | 419 |
कोणाला दिली जाते पर्पल कॅप
दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.
इशान किशनची दमदार फलंदाजी
मुंबईकडून इशान किशनने दमदार फलंदाजी केली. त्याने 35 चेंडूत 48 धावा फटकावल्या. रोहित शर्मा पुन्हा फेल ठरला. त्याला नॉर्खियाने झेलबाद केलं. ऋषभ पंतने डेवाल्ड ब्रेव्हिसचा सोपा झेल सोडला. ब्रेव्हिसने 37 धावा केल्या यात एक चौकार आणि तीन षटकार होते. तिलक वर्माने 21 धावा केल्या. तो ही मोक्याच्याक्षणी नॉर्खियाच्या गोलंदाजीवर बाद झाला. मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब करणाऱ्या रमणदीपने 6 चेंडूत नाबाद 13 धावा केल्या. यात दोन चौकार होते. गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हे प्लेऑफमध्ये दाखल होणारे चार संघ आहेत.