अरे बापरे, Shaheen Afridi चा डेंजर बॉल, बॅटचे दोन तुकडे VIDEO व्हायरल

PSL 2023 : 26 फेब्रुवारीच्या संध्याकाळी लाहोर कलंदर्स आणि पेशावर जाल्मी या दोन टीम्समध्ये सामना झाला. त्या मॅचमध्ये शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीची दहशत दिसून आली.

अरे बापरे, Shaheen Afridi चा डेंजर बॉल, बॅटचे दोन तुकडे VIDEO व्हायरल
psl Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 11:47 AM

PSL 2023 : पीएसएल मध्ये शाहीन शाह आफ्रिदीची ‘दादागिरी’ सुरु आहे. त्याची बॉलिंग खेळणं PSL मधल्या बॅट्समनसाठी मोठं चॅलेंज बनलय. शाहीन शाह आफ्रिदी सहज विकेट काढतोय. शाहीन शाह आफ्रिदीच्या एका घातक चेंडूवर बॅटचे दोन तुकडे झाले. त्यानंतर शाहीनने दमदार यॉर्कवर बॅट्समनला तंबूत धाडलं. 26 फेब्रुवारीच्या संध्याकाळी लाहोर कलंदर्स आणि पेशावर जाल्मी या दोन टीम्समध्ये सामना झाला. त्या मॅचमध्ये शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीची दहशत दिसून आली.

फ्रंटवर राहून लीड

या मॅचमध्ये धावांचा पाऊस पडला. लाहोर कलंदर्सने पहिली बॅटिंग करताना धावा लुटल्या. त्यानंतर विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पेशावर जाल्मीने सुद्धा तसाच पलटवार केला. पण युद्धात कोणीतरी एकच जिंकतो. क्रिकेटच्या या युद्धात लाहोर कलंदर्सने बाजी मारली. या विजयात कॅप्टन शाहीन शाह आफ्रिदीने फ्रंटवर राहून लीड केलं.

आधी बॅट तोडली नंतर विकेट

लाहोर कलंदर्सने पेशावर जाल्मीसमोर विजयासाठी 20 ओव्हर्समध्ये विजयासाठी 242 धावांच टार्गेट ठेवलं होतं. पेशावर जाल्मीला विजयापासून दूर ठेवण्यात लाहोर कलंदर्सचा कॅप्टन शाहीन शाह आफ्रिदीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने पहिल्या चेंडूपासून पेशावर टीमवर दबाव निर्माण केला. पेशावर जाल्मीच्या इनिंगमध्ये पहिल्या चेंडूवरच शाहीनच्या चेंडूवर बॅट्समनची बॅट तुटली. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर शाहीनने त्याची विकेट काढली.

बाबरला दिला झटका

शाहीन शाह आफ्रिदीने ज्या बॅट्समनला डगआऊटमध्ये पाठवलं, त्याच नाव मोहम्मद हॅरिस आहे. शाहीन शाह आफ्रिदी एवढ्यावरच थांबला नाही. ही फक्त पहिल्या ओव्हरमधील कामगिरी झाली. त्यानंतर शाहीनने दुसऱ्या ओव्हरमध्ये बाबर आजमला बोल्ड करुन खळबळ उडवून दिली. PSL मध्ये शाहीन शाह आफ्रिदीने दुसऱ्यांदा बाबर आजमला आऊट केलं. PSL शाहीनचा पंच

पावरप्लेमध्ये 2 विकेट घेतल्यानंतर डेथ ओव्हर्समध्ये शाहीनने आणखी 3 विकेट काढल्या. 17 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर वहाब रियाज, 19 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर शान मसूद आणि त्याच ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर नीशामची विकेट काढली. बॅट तोडल्यानंतर शाहीनने या मॅचमध्ये पंच मारला. PSL च्या इतिहासात शाहीन शाह आफ्रिदीने दुसऱ्यांदा 5 विकेट घेण्याचा कारनामा केला.

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.