AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK टीममध्ये एकच वादा धोनी ‘दादा’, ज्यूनियर्स MS ला किती घाबरतात त्यासाठी हा VIDEO बघा

Holi 2023: होळीचा सण संपूर्ण देशात धूम धडाक्यात साजरा केला जातोय. चेन्नई सुपर किंग्सची टीम धुळवड साजरी करण्यामध्ये अजिबात मागे नव्हती. पण या रंगाच्या उत्सवात धोनीला कोणी कलर लावला की नाही?

CSK टीममध्ये एकच वादा धोनी 'दादा', ज्यूनियर्स MS ला किती घाबरतात त्यासाठी हा VIDEO बघा
MS Dhoni Image Credit source: VideoGrab
| Updated on: Mar 08, 2023 | 9:13 AM
Share

Holi 2023 : रंगांचा सण म्हणजे होळी. संपूर्ण देशात धूमधडाक्यात होळीचा सण उत्साहात साजरा केला जातोय. फक्त सर्वसामान्य नाही, स्टार क्रिकेटर्सनी सुद्धा रंगपंचमीचा आनंद लुटला. विराट कोहली असो, किंवा रोहित शर्मा सर्वांनीच या सणाचा आनंद लुटला. एमएस धोनीची टीम चेन्नई सुपर किंग्समध्ये सुद्धा रंगपंचमीचा उत्साह दिसून आला. चेन्नई सुपरकिंग्सने त्यांच्या टि्वटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. यात फ्रेंचायजीचे खेळाडू रंगपंचमी खेळताना दिसतायत. सीएसकेची टीम रंगपंचमी खेळली पण कोणी धोनीला हात लावण्याची हिम्मत केली नाही. त्याच्या चेहऱ्यावर रंग दिसला नाही.

रंग लावण्यासाठी परस्परांवर तुटून पडले

धोनीच्या टीममधील खेळाडू परस्परांना रंग लावताना दिसले. चेन्नईच्या टीमने जो व्हिडिओ पोस्ट केलाय, त्याची सुरुवात शोले चित्रपटातील विलन गब्बर सिंहच्या डायलॉगने होते. वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे विचारतो, कधी आहे होळी? त्यानंतर खेळाडू रंग लावण्यासाठी परस्परांवर तुटून पडले. चेन्नई टीमचे युवा खेळाडू मौज-मस्ती करताना दिसले.

कोणाला खेचून आणलं?

सीएसके टीममधील प्रशांत सोलंकीला रंग लावण्यासाठी सहकारी खेळाडूंनी त्याला अक्षरक्ष: खेचून आणलं. त्यानंतर त्याच्यावर गुलाल टाकण्यात आला. व्हिडिओच्या अखेरीस धोनी सुद्धा दिसला. पण त्याचा चेहरा स्वच्छ होता. धोनी काहीतरी खात होता. टीममधील कुठल्याही खेळाडूने धोनीला रंग लावण्याची हिम्मत केली नाही. टीम इंडियाने साजरी केली धुळवड

भारतीय क्रिकेट टीमने अहमदाबादमध्ये रंगपंचमी साजरी केली. विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल बसमध्ये परस्परांवर रंग उडवताना दिसले रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल सर्वांचे चेहरे गुलालाने माखलेले होते. आता 9 मार्चपासून अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यातही टीम इंडियाने अशीच विजयाची धुळवड साजरी करावी, अशी इच्छा आहे. टीम इंडिया चालू सीरीजमध्ये 2-1 ने आघाडीवर आहे. अहमदाबादमध्ये विजय मिळवल्यास टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच तिकीट मिळेल.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.