LSG vs DC IPL 2022: राहुलच्या कॅप्टन इनिंग्समुळे लखनौचा धावांचा डोंगर, ऋषभच्या दिल्लीला हे टार्गेट झेपेल?
लखनौ सुपर जायंट्सचा संघ पॉइंटस टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात दोन पॉइंटस मिळवून ते दुसऱ्या स्थानावर पोहोचण्याचा प्रयत्न करतील.
मुंबई: दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स (DC vs LSG) मध्ये आपीएलच्या यंदाच्या सीजनमधला 45 वा सामना सुरु आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. आज लखनौचा कॅप्टन केएल राहुलने (KL Rahul) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या राहुलने क्विंटन डि कॉक सोबत मिळून चांगली सुरुवात केली व आपला निर्णय योग्य असल्याचं सिद्ध केलं. क्विंटन डि कॉक चांगली फलंदाजी करत होता. पण शार्दुल ठाकूरने (Sharudul Thakur) त्याला ललित यादवकरवी 23 धावांवर झेलबाद केलं. 42 रन्सवर लखनौची पहिली विकेट गेली. त्यानंतर केएल राहुल आणि दीपक हुड्डाने मिळून डाव सावरला. दोघांनी अर्धशतक झळकावली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी केली. राहुल आज पुन्हा कॅप्टन इनिंग्स खेळला. त्याने 51 चेंडूत 77 धावा फटकावल्या. यात चार चौकार आणि पाच षटकार होते. त्याला सुद्धा शार्दुल ठाकूरनेच ललिलत यादवकरवी झेलबाद केलं. पण तो पर्यंत खूप उशीर झाला होता. लखनौचा डाव सुस्थितीत पोहोचला होता.
लखनौ दुसऱ्या स्थानावर पोहोचणार?
दीपक हुड्डाला 52 रन्सवर शार्दुलनेच आपल्या गोलंदाजीवर झेलबाद केलं. त्याने सहा चौकार आणि एक षटकार खेचला. निर्धारीत 20 षटकात लखनौने तीन बाद 195 धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्सचा संघ पॉइंटस टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात दोन पॉइंटस मिळवून ते दुसऱ्या स्थानावर पोहोचण्याचा प्रयत्न करतील. दिल्लीला प्लेऑफच्या दिशेने भक्कम पाऊल टाकण्यासाठी आजच्या सामन्यात विजय आवश्यक आहे. दिल्लीच्या खात्यात चार विजय आणि चार पराभव आहे.
राहुलची क्लासिक कॅप्टन इनिंग्स इथे क्लिक करुन पहा
Ise kehte hain ek #SuperGiant भौकाल-worthy performance ?#AbApniBaariHai?#IPL2022 ? #bhaukaalmachadenge #LucknowSuperGiants #T20 #TataIPL pic.twitter.com/tyrughPWMb
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 1, 2022
परफेक्ट क्रिकेटिंग शॉट्स
वेगवान गोलंदाज असो किंवा फिरकी केएल राहुल खूप सहजतेने धावा वसूल करतो. आजच्या सामन्यातही तेच दिसून आलं. राहुलच्या फलंदाजीत टायमिंग आणि ड्राइव्हची झलक पहायला मिळते. ज्याला आपण परफेक्ट क्रिकेटिंग शॉट्स म्हणतो. अशी फलंदाजी सध्या केएल राहुल करतोय. आज लखनौ विरुद्धच्या सामन्यातही त्याची तशीच फलंदाजी सुरु आहे. आयपीएल 2022 च्या या सीजनमध्ये राहुलने आतापर्यंत दहा सामन्यात 59.71 च्या सरासरीने 418 धावा केल्या आहेत. यात दोन शतकं आणि एक अर्धशतक आहे.