GT vs LSG : आयपीएल 2025 स्पर्धेत शार्दुल ठाकुरचं द्विशतक! गुजरातविरुद्धच्या सामन्यात नोंदवला विक्रम
आयपीएल 2025 स्पर्धेतील 26वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात सामना रंगला आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सने 20 षटकात 6 गडी गमवून 180 धावा केल्या. तसेच विजयासाठी 181 धावांचं आव्हान दिलं आहे. असं असताना शार्दुल ठाकुरच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेच्या 26व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल कर्णधार ऋषभ पंतने जिंकला आणि गुजरातला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. या सामन्यात साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांनी सावध सुरुवात केली. मात्र असं असूनही गुजरातला 20 षटकात 6 गडी गमवून 180 धावांपर्यंत मजल मारता आली. लखनौ सुपर जायंट्ससमोर विजयासाठी 181 धावांचं आव्हान होतं. लखनौ सुपर जायंट्सकडून शार्दुल ठाकुरने चांगली गोलंदाजी केली. इतकंच काय तर एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. शार्दुल ठाकुरने 4 षटकात 34 धावा देत 2 गडी बाद केले. या दोन विकेटसह शार्दुल ठाकुरने टी20 करिअरमध्ये 200 विकेटचा पल्ला गाठला आहे. शार्दुल ठाकुर लखनौ सुपर जायंट्ससाठी चांगली कामगिरी करत आहे.
शार्दुल ठाकुरने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यात 11 विकेट्स घेतल्या आहेत. दिल्लीविरुद्ध खेळलेल्या पहिल्या सामन्यात दोन विकेट घेतल्या होत्या. तर हैदराबादविरुद्धच्या सामन्यात चार विकेट घेतल्या होत्या. या शिवाय मुंबई इंडियन्स विरुद्ध 1 आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 2 गडी बाद केले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेटच्या यादीत शार्दुल ठाकुर दुसऱ्या स्थानावर आहे. नूर अहमद पहिल्या स्थानावर असून त्याच्या नावावर 12 विकेट आहेत. त्याच्या डोक्यावर पर्पल कॅप आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन : एडन मार्करम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), हिम्मत सिंग, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आकाश दीप, दिग्वेश सिंग राठी, आवेश खान आणि रवी बिश्नोई.
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर आणि मोहम्मद सिराज.
