LSG vs PBKS IPL 2023 Highlights | सिंकदर रजा याची अर्धशतकी खेळी, पंजाबचा लखनऊवर 2 विकेट्सने विजय

| Updated on: Apr 16, 2023 | 12:39 AM

LSG vs PBKS IPL 2023 Highlights In Marathi | आयपीएलच्या 16 व्या मोसमातील 21 व्या सामन्यात पंजाब किंग्सने लखनऊ सुपर जायंट्स टीमचा त्यांच्याच घरात 2 विकेट्स पराभव केला आहे.

LSG vs PBKS IPL 2023 Highlights | सिंकदर रजा याची अर्धशतकी खेळी, पंजाबचा लखनऊवर 2 विकेट्सने विजय

लखनऊ | आयपीएल 16 व्या मोसमात 15 एप्रिल रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यत आलं होतं. या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सने लखनऊ सुपर जायंट्सवर 2 विकेट्सने विजय मिळवला आहे. लखनऊ आणि पंजाब या दोन्ही संघांचा हा या मोसमातील हा पाचवा सामना होता. पंजाबने लखनऊला पराभूत करत या मोसमातील आपला तिसरा विजय मिळवला. या विजयासह पंजाबने लखनऊने विजयी घोडदौड रोखली.  लखनऊ सुपर जायंट्सने पंजाब किंग्सला विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबने हे आव्हान 8 विकेट्स गमावून पूर्ण केलं. पंजाबने 19.3 ओव्हरमध्ये 161 धावा केल्या. सिकंदर रझा आणि शाहरुख खान या दोघांनी पंजाबच्या विजयात मोठी भूमिका बजावली. सिकंदर रजा याने पंजाबडून सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. तर अखेरच्या क्षणी शाहरुख खान याने नाबाद 23 धावा करत निर्णायक भूमिका पार पाडली.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 15 Apr 2023 11:31 PM (IST)

    LSG vs PBKS IPL 2023 Live Score | पंजाब किंग्सचा 2 विकेट्सने विजय

    पंजाब किंग्सने लखनऊ सुपर किंग्सवर शेवटच्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स विजय मिळवला आहे.  लखनऊने विजयासाठी दिलेलं 160 धावंचं आव्हान पंजाबने  8 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

  • 15 Apr 2023 11:28 PM (IST)

    LSG vs PBKS IPL 2023 Live Score | पंजाबला आठवा झटका

    पंजाबने आठवी विकेट गमावली आहे.  हरप्रीत ब्ररार 6 धावांवर आऊट झाला आहे.

  • 15 Apr 2023 11:21 PM (IST)

    LSG vs PBKS IPL 2023 Live Score | सिंकदर रजा आऊट, पंजाबला सातवा झटका

    पंजाबला निर्णायक क्षणी मोठा धक्का लागला आहे.  सिंकदर रजा आऊट झाला आहे. सिंकदरने 57 धावांची अर्धशतकी खेळी केली.

  • 15 Apr 2023 11:01 PM (IST)

    LSG vs PBKS IPL 2023 Live Score | जितेश शर्मा आऊट, पंजाबला सहावा झटका

    पंजाबने सहावी विकेट गमावली आहे.  लखनऊ कॅप्टन केएल राहुल याने  जितेश शर्मा याचा हवेत झेप घेत अफलातून कॅच घेतला.

  • 15 Apr 2023 10:51 PM (IST)

    LSG vs PBKS IPL 2023 Live Score | सॅम करण आऊट

    पंजाबला मोठा झटका लागला आहे. कॅप्टन सॅम करण आऊट झाला आहे. अशा प्रकारे पंजाबचा अर्धा संघ आऊट झाला आहे.

  • 15 Apr 2023 10:37 PM (IST)

    LSG vs PBKS IPL 2023 Live Score | हरप्रीत भाटीया आऊट

    पंजाब किंग्सने चौथी विकेटस गमावली आहे. हरप्रीत भाटीया 22 धावा करुन कॅट आऊट झाला आहे.

  • 15 Apr 2023 10:32 PM (IST)

    LSG vs PBKS IPL 2023 Live Score | मॅथ्यू शॉर्ट आऊट, पंजाबला तिसरा धक्का

    पंजाब किंग्सने मॅथ्यू शॉर्ट याच्या रुपात तिसरी विकेट गमावली. शॉर्ट याने 34 धावांची खेळी केली.

  • 15 Apr 2023 09:55 PM (IST)

    LSG vs PBKS IPL 2023 Live Score | प्रभासिमरन सिंह आऊट

    पंजाब किंग्सला दुसरा झटका लागला आहे. प्रभासिमरन सिंह 4 धावा करुन आऊट झाला आहे.

  • 15 Apr 2023 09:45 PM (IST)

    LSG vs PBKS IPL 2023 Live Score | अथर्व तायडे पहिल्याच बॉलवर आऊट

    पंजाब किंग्सची 160 धावांचा पाठलागा करताना वाईट सुरुवात झाली आहे. दिल्लीचा बॉलर युद्धवीर याने अथर्व तायडे याला पंजाबच्या डावातील पहिल्याच बॉलवर आऊट केलं आहे.

  • 15 Apr 2023 09:32 PM (IST)

    LSG vs PBKS IPL 2023 Live Score | पंजाब किंग्सला विजयासाठी 160 रन्सचं टार्गेट

    लखनऊ सुपर जायंट्सने पंजाब किंग्सला विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं आहे. लखनऊ सुपर जायंट्सने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 159 धावा केल्या. लखनऊला चांगली सुरुवात मिळाली. कॅप्टन केएल राहुल याने या मोसमातील पहिलंवहिलं खणखणीत अर्धशतक ठोकलं. मात्र अखेरीच ज्या फिनिशिंग टचची अपेक्षा होती, तसा टच इतर कोणत्याही फलंदाजाला देता आला नाही. लखनऊकडून केएल राहुल याने सर्वाधिक 74 धावांची खेळी केली.  कायले मेयर्स याने 29 धावा केल्या. कृणाल पंड्या याने 18 तर मार्कस स्टोयनिस याने 15 रन्स केल्या. दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर उर्वरित फलंदाजांना दुहेरी आकडा गाठण्यात अपयश आलं.

    पंजाब किंग्सकडून कॅप्टन सॅम कुरने याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. कगिसो रबाडा याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.  तर हरप्रीत ब्ररार,  अर्शदीप सिंह आणि सिकंदर रजा या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

  • 15 Apr 2023 08:52 PM (IST)

    LSG vs PBKS IPL 2023 Live Score | धोकादायक निकोलस पूरन आऊट

    पंजाब किंग्सने लखनऊ सुपर जायंट्सचा धोकादायक फलंदाज निकोलस पूरन याला आऊट केलं आहे. अशा प्रकारे लखनऊने चौथी विकेट गमावली आहे.

  • 15 Apr 2023 08:43 PM (IST)

    LSG vs PBKS IPL 2023 Live Score | लखनऊला तिसरा झटका

    लखनऊ सुपर जायंट्सने तिसरी विकेट गमावली आहे. कृणाल पंड्या आऊट झाला आहे.

  • 15 Apr 2023 08:36 PM (IST)

    LSG vs PBKS IPL 2023 Live Score | केएल राहुल याचं अर्धशतक

    लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल याने अर्धशतक ठोकलंय. केएलचं या मोसमातील हे पहिलंवहिलं अर्धशतक आहे.

  • 15 Apr 2023 08:17 PM (IST)

    LSG vs PBKS IPL 2023 Live Score | दीपक हुड्डा आऊट

    लखनऊ सुपर जायंट्सने दुसरी विकेट गमावली आहे. दीपक हुड्डा याला 2 धावांवर सिंकदर रजा याने एलबीडबल्यू आऊट केलं.

  • 15 Apr 2023 08:04 PM (IST)

    LSG vs PBKS IPL 2023 Live Score | धोकादायक कायले मेयर्स आऊट

    लखनऊ सुपर जायंट्सला चांगल्या सुरुवातीनंतर पहिला झटका लागला आहे.  कॅप्टन केएल राहुल आणि कायले मेयर्स या दोघांनी 53 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर कायले मेयर्स 23 बॉलमध्ये 29 धावा करुन आऊट झाला.

  • 15 Apr 2023 07:54 PM (IST)

    LSG vs PBKS IPL 2023 Live Score | लखनऊची आश्वासक सुरुवात

    लखनऊच्या केएल राहुल आणि कायले मेयर्स या सलामी जोडीने टीमला आश्वासक सुरुवात मिळवून दिली आहे. या जोडीने पहिल्या 5  ओव्हरमध्ये 42 धावा केल्या आहेत.

  • 15 Apr 2023 07:37 PM (IST)

    LSG vs PBKS IPL 2023 Live Score | लखनऊ सुपर जायंट्सच्या बॅटिंगला सुरुवात

    लखनऊ सुपर जायंट्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. पंजाब किंग्सने टॉस जिंकून लखनऊला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

  • 15 Apr 2023 07:16 PM (IST)

    LSG vs PBKS IPL 2023 Live Score | पंजाब प्लेइंग इलेव्हन

    पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | सॅम कुरेन (कर्णधार), अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया, सिकंदर रझा, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.

  • 15 Apr 2023 07:15 PM (IST)

    LSG vs PBKS IPL 2023 Live Score | लखनऊ प्लेइंग इलेव्हन

    लखनऊ प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन), कायले मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पांड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, आवेश खान, युधवीर सिंग चरक, मार्क वुड आणि रवि बिश्नोई.

  • 15 Apr 2023 07:03 PM (IST)

    LSG vs PBKS IPL 2023 Live Score | पंजाब किंग्सने टॉस जिंकला

    लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्सने टॉस जिंकला आहे. कॅप्टन सॅम कुरेन याने लखनऊला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

  • 15 Apr 2023 06:35 PM (IST)

    LSG vs PBKS IPL 2023 Live Score | लखनऊ विरुद्ध पंजाब आमनासामना

    आयपीएलच्या 16 व्या मोसमातील 21 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात आमनासामना होणार आहे. पंजाबचं कर्णधारपद शिखर धवन याच्याकडे आहे. तर लखनऊची कॅप्ट्न्सीची जबाबदारी केएल राहुल सांभाळणार आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील पाचवा सामना आहे. लखनऊ पॉइंट्स टेबलमध्ये 3 विजयासह दुसऱ्या आणि पंजाब 4 पॉइंट्ससह सहाव्या स्थानी विराजमान आहे.

Published On - Apr 15,2023 6:30 PM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.