LSG vs RCB IPL 2022 Eliminator Live updates: लखनौचं आव्हान संपुष्टात, RCB चा 14 धावांनी विजय
lucknow super giants vs royal challengers bangalore eliminator Match live: आज जिंकणाऱ्या संघाला क्वालिफायर 2 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळावं लागेल.
LSG vs RCB, IPL 2022 Eliminator: लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये (LSG vs RCB) एक रोमांचक सामना पहायला मिळाला. एलिमिनेटरच्या या महत्त्वाच्या सामन्यात RCB ने लखनौ सुपर जायंट्सवर 14 धावांनी विजय मिळवला. बँगलोरने विजयासाठी 208 धावांचं लक्ष्य दिलं होतं. लखनौ सुपर जायंट्सने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये सहा बाद 193 धावा केल्या. लखनौकडून के.एल. राहुलने (KL Rahul) कॅप्टन इनिंग्सचा खेळ दाखवला. त्याने 58 चेंडूत 79 धावा केल्या. यात तीन चौकार आणि पाच षटकार होते. राहुल खेळपट्टीवर असे पर्यंत लखनौच्या विजयाची आशा वाटत होती. पण 19 व्या षटकात जोश हेझलवुडच्या गोलंदाजीवर राहुलने शाहबाज अहमदकडे झेल दिला. पाठोपाठ पुढच्याच चेंडूवर कृणाल पंड्या शुन्यावर आऊट झाला. त्याने हेझलवूडकडेच झेल दिला. 19 व्या षटकातील या दोन विकेटसमुळे सामन्याचं पारड आरसीबीच्या बाजूने झुकलं. शेवटच्या षटकात हर्षल पटेलने आपलं काम चोख बजावलं. केएल राहुलला दीपक हुड्डाने चांगली साथ दिली. त्याने 26 चेंडूत 45 धावा फटकावल्या. यात एक चौकार आणि चार षटकार आहेत. दीपक हुड्डाला वानिंन्दु हसरंगाने क्लीन बोल्ड केलं.
Key Events
लखनौला आजची मॅच जिंकायची असेल, तर कॅप्टन केएल राहुल आणि क्विंटन डि कॉकची बॅट चालणं आवश्यक आहे.
विराट कोहलीने मागच्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात दमदार फलंदाजी करुन फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले होते. आज पुन्हा एकदा त्याच्याकडून धावांची अपेक्षा आहे.
LIVE Cricket Score & Updates
-
लखनौचा आव्हान संपुष्टात, RCB चा 14 धावांनी विजय
एलिमिनेटरच्या महत्त्वाच्या सामन्या आरसीबीने लखनौ सुपर जायंट्सवर 14 धावांनी विजय मिळवला. लखनौने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये सहा बाद 193 धावा केल्या.
-
RCB ला केएल राहुलची मोठी विकेट मिळाली
मोक्याच्याक्षणी RCB ला केएल राहुलची मोठी विकेट मिळाली. राहुल 79 धावांवर बाद झाला. लखनौच्या पाच बाद 180 धावा झाल्या आहेत. 8 चेंडूत 28 धावांची आवश्यकता आहे.
-
-
स्टॉयनिस आऊट
महत्त्वाच्या क्षणी हर्षल पटेलने स्टॉयनिसची विकेट काढली. स्टॉयनिसने कव्हर्समध्ये फटका खेळला. तिथे पाटीदारने झेल घेतला. लखनौच्या चार बाद 173 धावा झाल्या आहेत.
-
18 चेंडूत विजयासाठी 41 धावांची आवश्यकता
17 ओव्हर्समध्ये लखनौच्या तीन बाद 167 घावा झाल्या आहेत. 18 चेंडूत विजयासाठी 41 धावांची आवश्यकता आहे.
-
दीपक हुड्डा बोल्ड पण केएल राहुलची फटकेबाजी
वानिंन्दु हसरंगाच्या ओव्हरमध्ये दीपक हुड्डा 45 धावांवर बोल्ड झाला. पण केएल राहुलची फटकेबाजी सुरुच आहे. तो 57 धावांवर खेळतोय. बँगलोरच्या 15 ओव्हर्समध्ये 3 बाद 143 धावा झाल्या आहेत.
-
-
राहुल-हुड्डाची जोडी जमली
13 षटकात लखनौच्या दोन बाद 109 धावा झाल्या आहेत. केएल राहुल 47 आणि दीपक हुड्डा 26 धावांवर खेळतोय
-
लखनौची खराब सुरुवात, दोन झटके
208 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या लखनौ सुपर जायंट्सची सुरुवात खराब झाली आहे. पाच षटकात दोन बाद 45 धावा झाल्या आहेत. क्विंटन डि कॉक स्वस्तात 6 धावांवर बाद झाला. मोहम्मद सिराजने डू प्लेसिसकरवी झेलबाद केलं. मनन व्होरा 19 धावांवर आऊट झाला. केएल राहुल आणि दीपक हुड्डाची जोडी मैदानात आहे.
-
बँगलोरचा धावांचा डोंगर, लखनौसमोर विजयासाठी विशाल लक्ष्य
रजत पाटीदार नाबाद 112 आणि दिनेश कार्तिकच्या 37 फटकेबाजीच्या बळावर RCB ने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 4 बाद 207 धावा केल्या आहेत.
-
आरसीबीच्या चार बाद 194 धावा
19 ओव्हर्समध्ये आरसीबीच्या चार बाद 194 धावा झाल्या आहेत.
-
मोठया सामन्यात रजत पाटीदारची शानदार सेंच्युरी
रजत पाटीदारने 49 चेंडूत शानदार सेंच्युरी झळकवली आहे. यात 11 चौकार आणि 6 षटकार आहेत. 18 ओव्हर्समध्ये चार बाद 173 धावा झाल्या आहेत.
-
रजत पाटीदार-दिनेश कार्तिकची जोडी जमली
17 ओव्हर्समध्ये आरसीबीच्या चार बाद 165 धावा झाल्या आहेत. रजत पाटीदार 93 आणि दिनेश कार्तिक 19 धावांवर खेळतोय.
-
रंजत पाटीदारची फटकेबाजी, रवी बिश्नोईला धोपटलं
रजत पाटीदार एकाबाजूने तुफान फलंदाजी करतोय. त्याने रवी बिश्नोई टाकत असलेल्या 16 व्या षटकात 27 धावा लुटल्या. आरसीबीच्या चार बाद 150 धावा झाल्या आहेत.
-
आरसीबी 100 धावांच्या पुढे
12 ओव्हर्समध्ये RCB च्या 3 बाद 106 धावा झाल्या आहेत. रजत पाटीदार (57) आणि माहीपाल लोमरॉर (12) धावांवर खेळतोय.
-
रजत पाटीदारची हाफ सेंच्युरी
11 ओव्हर्समध्ये RCB च्या 3 बाद 90 धावा झाल्या आहेत. रजत पाटीदारने हाफ सेंच्युरी झळकवलीय. विराट कोहली (25) धावांवर आऊट झाला. फाफू डू प्लेसिसला भोपळाही फोडता आला नाही. ग्लेन मॅक्सवले (9) धावांवर आऊट झाला. लखनौने टॉस जिंकून पहिलं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
-
कोलकात्यात पाऊस
कोलकात्यात सध्या पाऊस कोसळत आहे. पावसामुळे टॉसला विलंब झाला आहे. आरसीबी आणि लखनौमध्ये आज एलिमिनेटरचा सामना होत आहे.
Published On - May 25,2022 6:57 PM