Cricket | “निरोप घ्यायची वेळ आलीय..”, सोशल मीडियावर पोस्ट करत टीमला रामराम

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज डेव्हिड वॉर्नर याने निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यानंतर आता टीम इंडियाच्या दिग्ग्जाने साथ सोडली आहे. या स्टारने सोशल मीडियावर पोस्ट करत निरोप घेत असल्याचं जाहीर केलंय.

Cricket | निरोप घ्यायची वेळ आलीय.., सोशल मीडियावर पोस्ट करत टीमला रामराम
Follow us
| Updated on: Jan 01, 2024 | 7:29 PM

मुंबई | आयपीएल 17 व्या मोसमासाठी अजून बरेच दिवस बाकी आहेत. त्याआधी डिसेंबर 2023 मध्ये ऑक्शन पार पडला. या मिनी ऑक्शनमध्ये अनेक खेळाडू हे मालामाल झाले. ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स हे दोघे महागडे ठरले. तसेच इतर खेळाडूंवरही पैशांचा वर्षाव झाला. लिलावानंतर एकूण 10 संघांचे खेळाडू हे निश्चित झाले आहेत. आता क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा आहे ती आयपीएल 2024 च्या वेळापत्रकाची. या हंगामाला केव्हापासून सुरुवात होणार, याबाबतची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागून आहे. अशातच मोठी बातमी समोर आली आहे.

नववर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने कसोटीनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आता आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्स टीमच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. दिग्गज खेळाडूने लखनऊ सुपर जायंट्सचा निरोप घेतला आहे. दिग्गजाने इंस्टाग्रामवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

एलएसजी अर्थात लखनऊ सुपर जायंट्ससोबत 2 वर्ष सहाय्यक प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावणाऱ्या विजय दहीया यांनी त्यांचा प्रवास थांबवला आहे. दहीया यांनी स्वत: याबाबत माहिती दिलीय. “निरोप घेण्याचा वेळ आली आहे, एलएसजी, लखनऊ सुपर जायंट्स. टीमसोबत गेली 2 वर्ष काम करण्याचा अनुभव अप्रतिम होता. टीमला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा”, अशी पोस्ट विजय दहीया यांनी केली आहे.

विजय दहीया याची इंस्टा पोस्ट

विजय दहीया लखनऊ सुपर जायंट्ससह 2022 मध्ये जोडले गेले होते. या 2 वर्षात त्यांनी टीमसाठी योगदान दिलं. त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली. मात्र आता फ्रँचायजीने त्यांचा करार न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर लखनऊ सुपर जायंट्सच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी टीम इंडियाचे माजी कोच श्रीधरन श्रीराम यांची नियुक्ती केली आहे.

दरम्यान विजय दहीया यांच्याआधी गौतम गंभीर यानेही लखनऊ सुपर जायंट्ससोबतचा प्रवास थांबवला. गंभीर लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर होता. मात्र गंभीरने 17 व्या हंगामाआधी लखनऊची साथ सोडत घरवापसी केली. गंभीर आपल्या आधीच्या टीममध्ये अर्थात कोलकाता नाईट रायडर्स टीमसह जोडला गेला. गंभीर केकेआरमध्येही मेंटॉर म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.

वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.