KL Rahul IPL 2023 : मॅचआधी लखनौचा कॅप्टन केएल राहुलबाबत मोठी बातमी

KL Rahul IPL 2023 : केएल राहुलबाबत एक मोठा निर्णय झालाय. सीजनच्या ऐन मध्यावर हे सर्व घडलय. टीम इंडियाच सुद्धा टेन्शन वाढवणारी ही बातमी आहे. केएल राहुल बाबत जी भिती होती, तेच झालय.

KL Rahul IPL 2023 :  मॅचआधी लखनौचा कॅप्टन केएल राहुलबाबत मोठी बातमी
KL Rahul
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 3:19 PM

लखनौ : इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये दमदार प्रदर्शन करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सला धक्का बसला आहे. लखनौचा कॅप्टन केएल राहुल संदर्भात ही बातमी आहे. यापुढे लखनौ सुपर जायंट्सला त्यांचा आयपीएलमधील प्रवास केएल राहुलशिवाय करावा लागणार आहे. केएल राहुलला रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्याच्या दुखापतीच स्वरुप गंभीर होतं. त्यामुळे आजच्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध होणाऱ्या सामन्यात केएल राहुल खेळणार नव्हता.

आधी केएल राहुल फक्त आजची मॅच खेळणार नाही, असं वाटत होतं. पण आता केएल राहुल आयपीएलच्या उर्वरित सीजनमधून बाहेर गेल्याची बातमी आहे.

केएल राहुलला कुठे पाठवणार?

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्धच्या सामन्यात पळताना केएल राहुल खाली पडला होता. आता केएल राहुल टुर्नामेंटच्या उर्वरित सामन्यांमध्ये खेळणार नाही. त्याला बँगलोरच्या नॅशनल क्रिकेट अकादमीत पाठवलं जाणार आहे.

अजून स्कॅनिंग का नाही झालं?

पीटीआयच्या वृत्तानुसार, केएल राहुल सध्या लखनौमध्येच आहे. तिथून त्याला मुंबईला आणलं जाईल. बीसीसीआयची मेडीकल टीम त्याची तपासणी करेल. अजूनपर्यंत केएल राहुलच स्कॅनिंग झालेलं नाही. राहुलला जी दुखापत झालीय त्यात स्कॅनिंग 48 तासानंतरच शक्य आहे.

बीसीसीआय का धोका पत्करत नाहीय?

केएल राहुल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल टीमचा भाग आहे. 7 जून पासून इंग्लंडमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियात WTC ची फायनल रंगणार आहे. या सामन्याआधी राहुल फिट होईल का? हा प्रश्न आहे. WTC फायनलमुळेच कदाचित राहुल आयपीएलच्या यापुढच्या सामन्यांमध्ये खेळणार नसेल. बीसीसीआयला राहुलच्या फिटनेसची चिंता आहे. राहुलची कितपत गंभीर आहे, ते स्कॅनमधूनच समजेल.

चालू सीजनमध्ये केएल राहुलने किती धावा केल्या? केएल राहुलच बाहेर होणं हे लखनौ टीमसाठी एका झटक्यासारख आहे. राहुलची बॅट भले आता शांत असेल, पण तो कधीही फॉर्ममध्ये येऊ शकतो. आता दुखापतीमुळे तो पुढचे सामने खेळू शकणार नाहीय. त्याच्या अनुपस्थितीत क्रृणाल पंड्या टीमच नेतृत्व करेल. केएल राहुलने आयपीएलच्या चालू सीजनमध्ये 9 मॅचमध्ये 34.35 च्या सरासरीने 274 धावा केल्या आहेत. त्याने 2 हाफसेंच्युरी झळकवल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 113.22 चा आहे. केएल राहुल मागच्या 5 सीजनपासून कमालीच प्रदर्शन करत होता. या खेळाडूने 5 पैकी 4 सीजनमध्ये 600 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. केएल राहुलला आयपीएलमध्ये धाव बनवण्याची सवय आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.