AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: लखनौचे 7.5 कोटी रुपये पाण्यात, मॅच विनर खेळाडूला जोफ्रा आर्चरसारखी दुखापत

IPL 2022: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला (IPL) अवघ्या दोन आठवड्यांचा अवधी उरला आहे. असं असताना, प्रमुख संघांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत.

IPL 2022: लखनौचे 7.5 कोटी रुपये पाण्यात, मॅच विनर खेळाडूला जोफ्रा आर्चरसारखी दुखापत
मार्क वुड-जोफ्रा आर्चर Image Credit source: File photo
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 12:58 PM

नवी दिल्ली: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला (IPL) अवघ्या दोन आठवड्यांचा अवधी उरला आहे. असं असताना, प्रमुख संघांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. यंदा आयपीएलचा 15 वा सीजन 26 मार्च रोजी सुरु होणार आहे. आयपीएलमधल्या फ्रेंचायजींनी वेगवेगळ्या परदेशी खेळाडूंना मोठी किंमत मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे. अन्य देशांच्या क्रिकेट बोर्डांनी आखलेले दौरे तसंच दुखापतीमुळे अनेक खेळाडू मुख्य स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच बाहेर पडत आहेत. दक्षिण आफ्रिकेचा एनरिक नॉर्खिया दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीय. हा दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघासाठी एक झटका आहेच. पण आता लखनौ सुपर जायंट्सलाही (Lucknow super giants) वाईट बातमी मिळाली आहे. लखनौ सुपर जायंट्सचा मॅच विनिंग गोलंदाज मार्क वुडला दुखापत झाली आहे. एंटीगा टेस्ट दरम्यान मार्क वुडला गोलंदाजी करताना दुखापत झाली होती.

त्याच्या हाताचा कोपरा सूजला आहे. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दरम्यान कसोटी सामना सुरु आहे. दुखापतीमुळे मार्क वुडला पुढे गोलंदाजी करता आली नाही. वुडने फक्त चार षटक गोलंदाजी केली. त्याच्या कोपरामध्ये स्ट्रेस फ्रॅक्चर दिसत आहे.

जोफ्रा आर्चरसारखी दुखापत

मार्क वुडला जोफ्रा आर्चरसारखी दुखापत झाली आहे. त्याने वर्ष 2021 मध्ये कोपरा सुजल्याची तक्रार केली होती. जोफ्रा आर्चरची दोन ऑपरेशन्स झाली आहेत. मागच्या वर्षभरापासून आर्चर आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलपासून लांब आहे.

मार्क वुडची दुखापत लखनऊसाठी झटका

मार्क वुडला जोफ्रा आर्चरसारखी दुखापत झाली असेल, तर तो लखनऊ सुपर जायंट्ससाठी एक झटका आहे. लखनऊनने वुडसला 7.5 कोटी रुपये किंमतीला विकत घेतलं होतं. मार्क वुड 145 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करु शकतो. वुडने नुकत्याच संपलेल्या ASHES मालिकेत 17 विकेट घेतल्या होत्या. लखनऊ सुपर जायंट्स आयपीएलमधला नवीन संघ आहे. यंदाचा त्यांचा पहिला सीजन आहे.

हे दोन आहेत अन्य पर्याय

लखनऊ सुपरजायंट्सने आयपीएल 2022 मेगा ऑक्शनमध्ये मार्क वुड शिवाय अंकित राजपूत आणि आवेश खान या वेगवान गोलंदाजांनाही ताफ्यात घेतलं आहे. वुडच लखनऊच्या गोलंदाजीचं नेतृत्व करणार आहे. पण त्याला दुखापत होणं हा संघासाठी मोठा झटका आहे.

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.