IPL 2023, RCB vs LSG | लखनऊचा शेवटच्या बॉलवर चित्तथरारक विजय, आरसीबीवर 1 विकेटने मात

लखनऊ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर शेवटच्या बॉलवर सिंगल रन घेत सनसनाटी थरारक विजय मिळवला.

IPL 2023, RCB vs LSG | लखनऊचा शेवटच्या बॉलवर चित्तथरारक विजय, आरसीबीवर 1 विकेटने  मात
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 12:02 AM

बंगळुरु | लखनऊ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 1 विकेटने सनसनाटी विजय मिळवला आहे. लखनऊला विजयासाठी शेवटच्या बॉलवर विजयासाठी 1 रनची गरज होती. शेवटच्या बॉलवर लखनऊकडून आवेश खान स्ट्राईकवर आणि रवि बिश्नोई नॉन स्ट्राईकवर होता. हर्षल पटेल शेवटची ओव्हर टाकत होता. हर्षल पटेल याने टाकलेला शेवटचा बॉल आवेश खान याच्याकडून हुकला. मात्र त्यानंतरही आवेश खान याने धाव घेतली. यादरम्यान विकेटकीपर दिनेश कार्तिक अचूकपणे बॉल पकडण्यास अपयशी ठरला. मात्र जेव्हा कार्तिकने बॉल पकडून नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने फेकला तोवर आवेशने धाव पूर्ण केली. लखनऊने अशा प्रकारे शेवटच्या बॉलवर 1 धाव घेत आरसीबीचा त्यांच्या घरात पराभव केला.

शेवटच्या चेंडूचा थरार

आरसीबीची बॅटिंग

दरम्यान त्याआधी लखनऊने टॉस जिंकून आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 212 धावा केल्या. आरसीबीकडून कॅप्टन फाफ डु प्लेसीस, विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल या तिघांनी अर्धशतक ठोकलं. आरसीबीकडून कॅप्टन फाफ याने सर्वाधिक नाबाद 79, मॅक्सवेल याने 59 आणि विराटने 61 रन्सची खेळी केली.

विराट कोहली याने 44 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 4 चौकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. फाफ डु प्लेसीस याने 46 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 79 रन्सची इनिंग खेळली. ग्लेन मॅक्सवेल याने 3 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 59 धावा चोपल्या.

आरसीबीसाठी अनुक्रमे पहिल्या 3 फलंदाजांनी अर्धशतक ठोकण्याची आयपीएलच्या इतिहासातील पहिलीच वेळ ठरली. विराट, फाफ आणि ग्लेन या तिघांनी ही कामगिरी करुन दाखवली.

महत्त्वपूर्ण भागीदारी

विराट फाफ या दोघांनी 96 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर फाफ आणि ग्लेन मॅक्सवेल या जोडीने 59 बॉलमध्ये 115 धावांची भागादारी केली. लखनऊकडून अमित मिश्रा आणि मार्क वूड या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | के एल राहुल (कॅप्टन), कायले मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्क्स स्टॉयनिस, कृणाल पंड्या, अमित मिश्रा, रवी बिश्नोई, ए खान, जयदेव उनाडकट आणि मार्क वुड.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), एस अहमद, ए रावत, एच पटेल, डेव्हिड विली, मोहम्मद सिराज आणि वेन पारनेल.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.