VIDEO : रोहित शर्मा बाद होताच स्टेडियममध्ये जल्लोष; प्रेक्षकांनी टाळ्या, शिट्ट्यांनी मैदान दणाणून सोडलं, पण का?

भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka test) यांच्यात बंगळुरू येथे दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. गुलाबी चेंडूसह खेळवण्यात येत असलेल्या या डे-नाईट कसोटी सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे.

VIDEO : रोहित शर्मा बाद होताच स्टेडियममध्ये जल्लोष; प्रेक्षकांनी टाळ्या, शिट्ट्यांनी मैदान दणाणून सोडलं, पण का?
Rohit SharmaImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 5:04 PM

बंगळुरु : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka test) यांच्यात बंगळुरू येथे दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. गुलाबी चेंडूसह खेळवण्यात येत असलेल्या या डे-नाईट कसोटी सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. यादरम्यान सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानात एक रंजक दृश्य पाहायला मिळाले. बंगळुरू कसोटीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) बाद होऊन पव्हेलियनकडे जात असताना संपूर्ण मैदान आनंदाने दुमदुमले होते. यावेळी प्रेक्षकांनी जोरदार आरडाओरडा सुरु केला तसेच टाळ्या आणि शिट्ट्यांनी स्टेडियम दणाणून सोडलं. आता तुम्हाला वाटत असेल, सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जातोय, तेथे भारतीय प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित असणार तरीही हे प्रेक्षक रोहित बाद झाल्यावर का सेलिब्रेट करत होते. रोहित बाद झाला म्हणून प्रेक्षक सेलिब्रेट करत आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. प्रेक्षक रोहित बाद झाला म्हणून कल्ला करत नव्हते तर रोहित बाद झाल्यानंतर मैदानात येणाऱ्या पुढच्या फलंदाजाच्या स्वागतासाठी जल्लोष करत होते. पुढचा फलंदाज म्हणजे भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli). त्याने मैदानात पाऊल ठेवताच लोकांनी जल्लोष करत त्याचे स्वागत केले.

बीसीसीआयने या घटनेचा व्हिडिओही शेअर केला आहे. विराट कोहली बॅटिंगला आल्यावर स्टेडियमवर प्रेक्षकांनी जल्लोष केला. सर्व प्रेक्षक आराडओरडा करू लागले, टाळा, शिट्ट्या वाजवू लागले आणि ‘कोहली-कोहली…’ अशा घोषणा देऊ लागले. बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी मैदान हे विराट कोहलीचे होम ग्राऊंड नाही, मात्र आयपीएलमध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळतो. हे मैदान आरसीबी संघाचे होम ग्राऊंड आहे. विराट आयपीएलच्या सुरुवातीपासून या संघाचा भाग आहे. यामुळे बंगळुरूचे कोहलीशी खास नाते आहे.

बंगळुरु… विराटचं दुसरं होम ग्राऊंड

गेल्या 14 वर्षांपासून आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोहलीने या मैदानावर अनेक आयपीएल सामने खेळले आहेत, मात्र टीम इंडियासाठी तो केवळ 3 कसोटी सामने खेळला आहे. आणि त्यात त्याचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. कोहलीने या मैदानावर केवळ 4 डाव खेळले असून त्याची 60 पेक्षा जास्त सरासरीने 181 धावा केल्या आहेत. या मैदानावर कोहलीने कसोटीत एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आहे. चिन्नास्वामी येथे त्याने पहिल्याच कसोटी डावात शतक झळकावलं होतं. टीम इंडियात नव्याने ओळख झालेल्या कोहलीने 2012 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 103 धावांची इनिंग खेळली होती. कोहलीच्या कारकिर्दीतील हे केवळ दुसरे आणि भारतातील पहिले शतक ठरले. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने 51 धावा केल्या.

इतर बातम्या

IND VS SL: कुलदीप यादवला संधी न देताच बाहेर का केलं? जसप्रीत बुमराहने दिलं अजब उत्तर

IPL 2022: लखनौचे 7.5 कोटी रुपये पाण्यात, मॅच विनर खेळाडूला जोफ्रा आर्चरसारखी दुखापत

IND vs WI: वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत वेस्ट इंडिज विरुद्ध भारत अजिंक्य, आकडे यावेळी बदलणार?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.