AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकदा झालं आणि दुसऱ्यांदा तसं करताच…! महेंद्रसिंह धोनीने चाहत्याला खडसावलं Watch Video

आयपीएल 2025 स्पर्धेतही महेंद्रसिंह धोनची क्रेझ कायम आहे. त्याने काहीही केलं तरी चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचतो. मैदानातील आवाजाचा डेसिबल त्याच्या लोकप्रियतेची जाणीव करून देतो. महेंद्रसिंह धोनी मैदानात त्याच्या चपलखतेसाठी ओळखला जातो. त्याच्या पारखी नजरेतून सुटणं तसं कठीणच आहे. असं असताना महेंद्रसिंह धोनीने एका चाहत्याला बरोबर हेरलं.

एकदा झालं आणि दुसऱ्यांदा तसं करताच...! महेंद्रसिंह धोनीने चाहत्याला खडसावलं Watch Video
महेंद्रसिंह धोनीImage Credit source: video grab
| Updated on: Apr 17, 2025 | 8:38 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेत पाच वेळा जेतेपद मिळवलेल्या चेन्नई सुपर किंग्सची स्थिती एकदम नाजूक आहे. आतापर्यंत खेळलेल्या सात पैकी फक्त दोन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे गुणतालिकेत एकदम तळाशी आहे. आता प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचं तर चेन्नई सुपर किंग्सला प्रत्येक सामन्यात विजयाची चव चाखावी लागणार आहे. कारण दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं तर सर्व गणित जर तर वर येऊन ठेपेल. त्यात ऋतुराज गायकवाड दुखापग्रस्त झाल्याने संपूर्ण स्पर्धेला मुकला आहे. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंह धोनीच्या खांद्यावर सोपवली आहे. चाहत्यांना त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात कमबॅक केलं आहे. असं असताना महेंद्रसिंह धोनी आणि चाहत्याच्या संभाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरं तर हे हलकंफुलकं संभाषण आहे. पण धोनीच्या पारखी नजरेची दाद द्यावी लागेल.

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी ऑटोग्राफ मागणाऱ्या एका चाहत्याला खडसावताना दिसला. धोनी चाहत्यांना ऑटोग्राफ देत होता. पण त्याच्या बाजूला असलेला एक चाहता वारंवार ऑटोग्राफची विनंती करत होता. तेव्हा महेंद्रसिंह धोनी म्हणाली की, “मी त्या बाजूला येत आहे. मी येईन. हा तुमचा दुसरा ऑटोग्राफ आहे.” महेंद्रसिंह धोनीला त्याने या आधी ऑटोग्राफ घेतल्याचं माहिती होतं. पण चाहत्यांचा क्रेझ त्यालाही माहिती आहे. त्यामुळे त्यांना नाराज करत नाही.

महेंद्रसिंह धोनीने 2008 ते 2023 पर्यंत चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व केलं आहे. या दरम्यान त्याने पाचवेळा जेतेपद मिळवून दिलं आहे. पण 2024 पर्व सुरु होण्यापूर्वी त्याने कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवलं. या हंगामातही ऋतुराज गायकवाड संघाचं नेतृत्व करत होता. पण राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात जोफ्रा आर्चरच्या शॉर्ट बॉलमुळे दुखापत झाली. त्यानंतर संपूर्ण स्पर्धेला मुकला.

“एक सामना जिंकणे चांगले आहे. जेव्हा तुम्ही अशी स्पर्धा खेळता तेव्हा तुम्हाला सामने जिंकायचे असतात. दुर्दैवाने, काही सामने काही कारणास्तव आमच्या मनासारखे गेले नाहीत. याची अनेक कारणे असू शकतात. आमच्या बाजूने विजय असणे चांगले आहे,” असं धोनीने मागच्या विजयानंतर सांगितलं होतं.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.