ICC Awards 2020 | धोनीच्या ‘त्या’ निर्णयाला ICC चा कडक सॅल्युट, दशकातील सर्वोत्तम खेळभावना पुरस्कार
आयसीसीने सोमवारी 28 डिसेंबरला दशकातील पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला दशकातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू तर धोनीला दशकातील खेळभावना पुरस्कार मिळाला आहे.
दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिल अर्थात आयसीसीने (ICC)दशकातील पुरस्कारांवर टीम इंडियाच्या खेळाडूंनी छाप उमटवली आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) दशकातील खेळभावना पुरस्कार (ICC Spirit of Cricket of the decade) पटकावला आहे. या पुरस्करासाठी एकूण धोनीसह एकूण 7 जणांना नामांकन मिळालं होतं. धोनीने या 6 जणांना मागे टाकत हा पुरस्कार मिळवला आहे. (mahendra singh dhoni wins the icc spirit of cricket award of the decade 2020 )
महेंद्रसिंह धोनीला दशकातील खेळभावना पुरस्कार
?? MS DHONI wins the ICC Spirit of Cricket Award of the Decade ??
The former India captain was chosen by fans unanimously for his gesture of calling back England batsman Ian Bell after a bizarre run out in the Nottingham Test in 2011.#ICCAwards | #SpiritOfCricket pic.twitter.com/3eCpyyBXwu
— ICC (@ICC) December 28, 2020
या पुरस्काराच्या शर्यतीत टीम इंडियाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली, केन विल्यमन्सन, डॅनियल व्हिटोरी, महिला जयवर्धने आणि मिस्बाह उल हक हे खेळाडू होते.
धोनीला खिलाडूवृत्तीचे बक्षिस
क्रिकेटमध्ये काही खेळाडू हे चिडखोर वृत्तीचे असतात. मात्र धोनी याला अपवाद आहे. यामुळेच धोनी उजवा ठरतो. धोनीला त्याच्या प्रामाणिकपणा आणि खेळाडूवृत्तीमुळे आयसीसीचा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 2011 मध्ये नॉटिंघममध्ये सामना खेळण्यात आला होता. या सामन्यात इयन मॉर्गन आणि इयन बेल खेळत होते. मॉर्गनने मारलेला फटका सीमारेषेवर अडवण्यात आला. मात्र चेंडूने सीमारेषेला स्पर्श केला आहे, असं बेलला वाटलं. त्यामुळे हा चौकार आहे, असं गृहीत धरुन बेलने दुसऱ्या दिशेला निघाला. मात्र यावेळेस टीम इंडियाच्या खेळाडूने बेलला रनआऊट केलं.
नॉटिंघममधील ‘त्या’ निर्णयामुळे पुरस्कार
?? MS Dhoni's decision to recall Ian Bell to the crease during the 2011 Trent Bridge Test has seen the former India captain awarded the ICC Spirit of Cricket Award of the Decade ?
FULL STORY ?
— ICC (@ICC) December 28, 2020
थर्ड अंपाअरने बेलला बाद घोषित केलं. यानंतर टी टाईम झाला. चहापानानंतर तिसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाला. तेव्हा मॉर्गनसह बेलही मैदानात आला. त्यामुळे क्रिकेट चाहते चक्रावले. मात्र बेल गैरसमजामुळे बाद झाला, हे धोनीच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे धोनीने कर्णधार या नात्याने बेलला फलंदाजीसाठी बोलावलं. धोनीच्या या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुकही करण्यात आलं. तसेच धोनीला त्याच्या या खेळाडूवृत्तीचं बक्षिस मिळालं.
विराट दशकातील सर्वोत्तम क्रिकेटर
धोनीसह टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू हा पुरस्कार जाहीर केला आहे. विराटला एकूण 5 पुरस्कारांसाठी नामांकन देण्यात आलं होतं. त्यापैकी विराटला दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्काराचा मान मिळाला आहे.
संबंधित बातम्या :
ICC Awards | विराट कोहली दशकातील सर्वोत्तम क्रिकेटर
mahendra singh dhoni wins the icc spirit of cricket award of the decade 2020