MCA ने मुंबई पोलिसांचे 15 कोटी थकवले, थकबाकी वसुलीनंतरच सामन्यांना सुरक्षा देण्याची मागणी

वारंवार पत्र व्यवहार करुनही मुंबई पोलीस (Mumbai Police) थकबाकी पैसे वसूल करण्यासाठी स्वारस्य घेत नाही आणि थकबाकीदार मुंबई क्रिकेट असोसिएशनला (Mumbai Cricket Association) पुन्हा पुन्हा नवीन क्रिकेट सामन्यासाठी सुरक्षा उपलब्ध करुन देत आहे.

MCA ने मुंबई पोलिसांचे 15 कोटी थकवले, थकबाकी वसुलीनंतरच सामन्यांना सुरक्षा देण्याची मागणी
Mumbai Police - Mumbai Cricket AssociationImage Credit source: MCA-Wikipedia
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 5:48 PM

मुंबई : वारंवार पत्र व्यवहार करुनही मुंबई पोलीस (Mumbai Police) थकबाकी पैसे वसूल करण्यासाठी स्वारस्य घेत नाही आणि थकबाकीदार मुंबई क्रिकेट असोसिएशनला (Mumbai Cricket Association) पुन्हा पुन्हा नवीन क्रिकेट सामन्यासाठी सुरक्षा उपलब्ध करुन देत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई पोलिसांचे 14.82 कोटी रुपये थकविले आहेत. त्यासंबंधित पोलिसांच्या 35 स्मरणपत्रांना एमसीएने केराची टोपली दाखवली आहे. थकबाकी (Arrears) आधी वसूल केल्यानंतरच क्रिकेट सामन्यांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे केली आहे.मुंबई पोलिस मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट सामन्यांसाठी सुरक्षा पुरवतात आणि मुंबईतील क्रिकेट सामन्यांसाठी शुल्क आकारले जाते. विविध सामन्यांसाठी आकारलेले 14.82 कोटी रुपये थकीत असून मुंबई पोलिसांनी थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला 35 स्मरणपत्रे पाठवली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई पोलिसांनी दिली आहे.

आयपीएल, टी-20 वर्ल्ड कप, महिला विश्वचषक सामन्यांच्या आयोजनाचे पैसे थकीत

मुंबई पोलिसांनी गेल्या 8 वर्षातील विविध क्रिकेट सामन्याबद्दल माहिती दिली. या सामन्यांमध्ये वर्ष 2013 मध्ये संपन्न झालेला महिला क्रिकेट विश्वचषक, वर्ष 2016 ची टी-20 विश्वचषक स्पर्धा, वर्ष 2016 मधील कसोटी सामने, 2017 आणि वर्ष 2018 मध्ये खेळले गेलेली आयपीएल स्पर्धा आणि एकदिवसीय सामन्यांचे 14 कोटी 82 लाख 74 हजार 177 रुपये मुंबई क्रिकेट असोसिएशनने अद्याप भरलेले नाहीत. मुंबई क्रिकेट असोसिएशनने गेल्या 8 वर्षात फक्त 2018 च्या आयपीएल क्रिकेट सामन्यांसाठी आकारलेले 1.40 कोटीचे शुल्क प्रामाणिकपणे अदा केले आहे. मुंबई पोलिसांनी दावा केला आहे की, आतापर्यंत मुंबई पोलिसांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना 35 स्मरणपत्रे पाठवली आहेत. तर या थकबाकी रक्कमेवर 9.5 टक्के व्याज आकारले जाणार आहे.

गृह खात्याचं दुर्लक्ष

1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत झालेल्या क्रिकेट सामन्यांसाठी घेतलेल्या सुरक्षा अंतर्गत शुल्क अद्याप आकारलेले नाही. कारण किती शुल्क आकारले जावे यासाठी महाराष्ट्र सरकारने अद्याप आदेश जारी केलेला नाही. मुंबई पोलिसांनी याबाबत गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना 9 वेळा पत्रव्यवहार केला आहे. पण ढिम्म गृह खाते प्रतिसाद देत नाही. मी याबाबत पत्रव्यवहार करत असून मुंबई पोलिसांनी अद्यापही ठोस कारवाई न केल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशन मुंबई पोलिसांना गांभीर्याने घेत नाही, असे गलगली यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र

अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील आणि अन्य अधिकारी वर्गास पत्र पाठवून मागणी केली आहे की, मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून 14.82 कोटी रुपयांची थकबाकी वसूल होइपर्यंत कुठल्याही क्रिकेट सामन्याला सुरक्षा न देणे आणि थकबाकी वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी गलगली यांनी केली आहे.

इतर बातम्या

CSK IPL 2022: धोनीच बेस्ट फिनिशर का? शेवटच्या पाच षटकातील ‘या’ आकेडवारीवर नजर मारा म्हणजे समजेल

Delhi Capitals IPL 2022: Unsold ठरलेल्या पुण्याच्या कौशल तांबेला पाँटिंग, आगरकरांसमोर गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी

KXIP IPL 2022: ‘त्यांनी न्याय केला नाही’, किंग्स इलेव्हन पंजाबबद्दल सुनील गावस्करांचं महत्त्वाचं विधान

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.