MI vs RCB : पहिली हार, वैतागला Rohit Sharma, पराभवासाठी दिली ‘ही’ कारणं

RCB vs MI Captain Rohit Sharma Statement : रोहितने यंदाच्या सीजनमधील पहिल्याच पराभवासाठी कोणाला धरलं जबाबदार? रोहित शर्माने सीजनमधील पहिल्या पराभवानंतर बोलताना त्याची बाजू मांडली.

MI vs RCB : पहिली हार,  वैतागला Rohit Sharma, पराभवासाठी दिली 'ही' कारणं
Rohit sharma Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 8:13 AM

RCB vs MI Captain Rohit Sharma Statement : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये पुन्हा एकदा पराभवाने सुरुवात केली आहे. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रविवारी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये सामना झाला. 16 व्या सीजनमधील दोन्ही टीम्सचा हा पहिला सामना होता. मुंबई इंडियन्सची सुरुवात पराभवाने झालीय. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या टीमने मुंबई इंडियन्सवर 8 विकेट राखून विजय मिळवला.

चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएल 2023 मधील पाचवा सामना खेळला गेला. मुंबई इंडियन्सने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावून 171 धावा केल्या.

मुंबईकडून तिलकची धुवाधार बॅटिंग

आरसीबीने विराट कोहली आणि कॅप्टन फाफ डुप्लेसीच्या शानदार बॅटिंगच्या बळावर 16.2 ओव्हर्समध्येच विजयी लक्ष्य गाठलं. मुंबई इंडियन्सच्या टीमकडून तिलक वर्माने सर्वाधिक 84 धावा केल्या. तिलकने 46 चेंडूत नाबाद 84 धावा फटकावल्या. त्याने 9 चौकार आणि 4 षटकार मारले.

विराट चांगला खेळला पण सामनावीर दुसराच

मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीमसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. पण कॅप्टन फाफ डुप्लेसी आणि विराट कोहलीच्या शानदार इनिंगने मुंबईच्या अपेक्षांवर पाणी फिरवलं. विराटने 49 चेंडूत 82 धावा फटकावताना 6 चौकार आणि 5 षटकार लगावले. तेच डुप्लेसीने 43 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या बळावर 73 धावा केल्या. अर्शद खानने 15 व्या ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर ही जोडी फोडली. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने 3 चेंडूत 2 सिक्स मारुन नाबाद 12 धावा केल्या. विराटने अर्शदच्या चेंडूवर विजयी सिक्स मारला. फाफ डुप्लेसीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

रोहित शर्मा पहिल्या पराभवावर काय म्हणाला?

पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा म्हणाला की, “बॅटिंग करताना पहिल्या 6 ओव्हरमध्ये आम्ही चांगली सुरुवात केली नाही. तिलक आणि अन्य काही फलंदाजांनी चांगला प्रयत्न केला. आम्ही चांगली बॉलिंग केली नाही. माझ्या मते बॅटिंगसाठी ही चांगली विकेट होती. तिलक सकारात्मक खेळतो. तो टॅलेंटेड आहे. त्याने काही चांगले शॉट मारले. त्याने हिम्मत दाखवली” तर निकाल वेगळा लागला असता

आयपीएल सीजनमध्ये पहिल्या सामन्यात पराभवाने सुरुवात होण्याची मुंबई इंडियन्सची ही 11 वी वेळ आहे. “आम्हाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवल्याबद्दल तिलकला सलाम. आम्ही लक्ष्य निश्चित केलं नव्हतं. पण आम्ही आमच्या क्षमतेच्या निम्मीपण बॅटिंग केली नाही. आम्ही 170 पर्यंत पोहोचलो. आणखी 30-40 धावा असत्या, तर निकाल काही वेगळा लागला असता” असं रोहित शर्मा म्हणाला.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.