MI vs CSK IPL 2022: चेन्नई विरुद्ध आज मुंबईसाठी ‘करो या मरो’, Play off साठी किती पॉइंटस हवे? समजून घ्या गणित

MI vs CSK IPL 2022: चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) हे इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ आहेत. आयपीएलचा यंदाचा 15 वा सीजन आहे.

MI vs CSK IPL 2022: चेन्नई विरुद्ध आज मुंबईसाठी 'करो या मरो', Play off साठी किती पॉइंटस हवे? समजून घ्या गणित
मुंबई इंडियन्स वि चेन्नई सुपर किंग्स Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 4:46 PM

मुंबई: चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) हे इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ आहेत. आयपीएलचा यंदाचा 15 वा सीजन आहे. मुंबईने आयपीएलचं पाच तर चेन्नईने चार वेळा विजेतेपद मिळवलं आहे. पण सध्याच्या सीजनमध्ये दोन्ही संघ खूपच खराब फॉर्ममध्ये आहेत. गुणतालिकेत (Points Table) दोन्ही संघ सध्या तळाला आहेत. मोसम जसजसा पुढे सरकतोय, तसतशी स्पर्धा अधिक तीव्र होत चाललीय. आयपीएलमधले (IPL) हे दोन मोठे संघ आहेत. पण सध्या स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरु आहे. आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन संघ भिडणार आहेत. या दोन्ही टीम्स परस्परांच्या कट्टर पारंपारिक प्रतिस्पर्धी आहेत.

आणखी एक पराभव, आव्हान संपलं

मुंबई इंडियन्ससाठी स्पर्धेतील प्रवास खूपच खडतर बनला आहे. आणखी एक पराभव त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणू शकतो. ‘करो या मरो’ अशी त्यांची स्थिती आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकण मुंबई इंडियन्ससाठी क्रमप्राप्त आहे. मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलमध्ये आतापर्यंत सहा सामने खेळला आहे. सर्वच सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. दुसऱ्याबाजूला चेन्नई सुपर किंग्सची स्थिती सुद्धा फार चांगली नाहीय. सहापैकी पाच सामन्यात त्यांचा पराभव झालाय. फक्त त्यांना एक विजय मिळवता आला आहे.

मुंबईचा रनरेट किती?

सुरुवातीचे सामने गमावणं मुंबई इंडियन्ससाठी नवीन नाहीय. पण रांगेत सहा सामने गमावणं हा या फ्रेंयाचजीसाठी एक नवीन रेकॉर्ड आहे. रोहित शर्माची टीम सध्या संघर्ष करतेय. त्यांचा नेट रन रेट -1.048 आहे. आयपीएल 2022 मधला हा सर्वात खराब रनरेट आहे. सीएसके आणि सनरायजर्स हैदराबाद या दोन संघांचाही निगेटिव्ह नेट रनरेट आहे. स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी मुंबई इंडियन्सकडे आठ सामने उरले आहेत. हे सर्व सामने मुंबईला चांगल्या फरकाने जिंकावे लागतील, तरच निगेटिव्ह मध्ये असलेला रनरेट पॉझिटिव्ह होऊ शकतो.

इतक्या पॉइंटसने आता भागणार नाही

यंदाच्या सीजनमध्ये 14 पॉइंटस मिळवून भागणार नाहीय. कारण 10 संघ आहेत. मुंबई इंडियन्सला टॉप 4 मध्ये पोहोचण्यासाठी उर्वरित आठ सामने जिंकून 16 गुण मिळवावे लागतील. सहा सामन्यात 12 गुण होतात. प्लेऑफ मध्ये जागा मिळवण्यासाठी इतक्या पॉइंटसने आता भागणार नाही. अन्य संघाच्या कामगिरीवरही बरच काही अवलंबून असेल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.