AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs CSK : रोहित-सूर्याची शतकी भागीदारी, मुंबईची विजयी हॅटट्रिक, चेन्नईला वानखेडेत 9 विकेट्सने लोळवलं

Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Result : मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सवर 9 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला आहे. मुंबईने यासह घरच्या मैदनात विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली.

MI vs CSK : रोहित-सूर्याची शतकी भागीदारी, मुंबईची विजयी हॅटट्रिक, चेन्नईला वानखेडेत 9 विकेट्सने लोळवलं
Dhoni Rohit And Suryakumar MI vs CSK Ipl 2025Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 20, 2025 | 11:15 PM
Share

रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या नाबाद शतकी भागीदारीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सवर वानखेडे स्टेडियममध्ये 9 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे. चेन्नईने मुंबईला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 15.4 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून पूर्ण केलं. मुंबईने यासह आयपीएलच्या 18 व्या मोसमातील सलग तिसरा तर एकूण चौथा विजय मिळवला. मुंबईने इंडियन्सने यासह वानखेडे स्टेडियममध्ये विजय मिळवून चेन्नई सुपर किंग्सने 23 मार्चला केलेल्या पराभवाची अचूक परतफेड केली.

रोहित-सूर्यकुमार यादवची विजयी खेळी

रायन रिकेल्टन आणि रोहित शर्मा या सलामी जोडीने मुंबईला 177 धावांचा पाठलाग करताना अप्रतिम सुरुवात करुन दिली. रायन आणि रोहित या दोघांनी पावरप्लेमध्ये फटकेबाजी केली आणि चेन्नईला बॅकफुटवर ढकललं. रायन आणि रोहितने या मोसमात पहिल्यांदा मुंबईसाठी अर्धशतकी सलामी भागीदारी केली. मात्र त्यानंतर रवींद्र जडेजा याने ही जोडी फोडली. जडेजाने रायनला डेब्यूटंट आयुष म्हात्रे याच्या हाती कॅच आऊट केलं. रायनने 19 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 3 फोरसह 24 रन्स केल्या.

मुंबईने 63 धावांवर पहिली विकेट गमावल्यानंतर सूर्यकुमार यादव तिसऱ्या स्थानी आला. सूर्याने तिसऱ्या स्थानी रोहितला अप्रतिम साथ दिली. या दोघांनी निर्भिडपणे विस्फोटक फलंदाजी केली. रोहितने या दरम्यान या मोसमातील पहिलंवहिलं अर्धशतक ठोकलं. तर दुसऱ्या बाजूला सूर्यकुमारने यानेही अर्धशतक झळकावलं. अशाप्रकारे या मुंबईकर आणि लोकल बॉय असलेल्या जोडीने पलटणला सहज, एकतर्फी आणि 26 बॉलआधी विजय मिळवून दिला.

रोहित-सूर्याची शतकी भागीदारी

रोहित आणि सूर्याने दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची नाबाद भागीदारी केली. रोहितने 45 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 4 फोरसह नॉट आऊट 76 रन्स केल्या. तर सूर्यकुमार यादव याने 30 चेंडूत 5 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 8 धावांची नाबाद खेळी केली. तर चेन्नई सुपर किंग्सकडून रवींद्र जडेजा याने एकमेव विकेट घेतली.

पलटणचा 9 विकेट्सने दणदणीत विजय

मुंबई सहाव्या स्थानी

दरम्यान मुंबई इंडियन्सने या विजयासह आणखी एक धमाका केला आहे. मुंबई इंडियन्सला पॉइंट्स टेबलमध्ये फायदा झाला आहे. मुंबई इंडियन्स पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी पोहचली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईचा नेट रनरेट हा +0.483 असा झाला आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.