MI vs DC IPL 2022: MI च्या टिम डेविड कृपेने RCB प्लेऑफमध्ये, दिल्लीचा खेळ खल्लास

IPL 2022 मध्ये एका महत्त्वाच्या सामन्यात Mumbai Indians ने Delhi Capitals वर विजय मिळवला. मुंबईने दिल्लीवर पाच विकेट राखून विजय मिळवला.

MI vs DC IPL 2022: MI च्या टिम डेविड कृपेने RCB प्लेऑफमध्ये, दिल्लीचा खेळ खल्लास
mumbai Indians Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 11:56 PM

मुंबई: IPL 2022 मध्ये एका महत्त्वाच्या सामन्यात Mumbai Indians ने Delhi Capitals वर विजय मिळवला. मुंबईने दिल्लीवर पाच विकेट राखून विजय मिळवला. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना रंगला होता. रमणदीप सिंहने चौकार ठोकून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. मुंबई इंडियन्सच्या आजच्या विजयाचा नायक पुन्हा एकदा टिम डेविड आहे. टिम डेविडने केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईला हा विजय मिळवता आला. टिम डेविडने 11 चेंडूत 34 धावा फटकावल्या. यात दोन चौकार आणि चार षटकार होते. मुंबईच्या विजयामुळे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा संघ प्लेऑफमध्ये दाखल झालाय. दिल्लीचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलय. दिल्लीने विजयासाठी 160 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मुंबईने 19.1 षटकात हे लक्ष्य पार केलं. सामना रोमांचक स्थिती मध्ये असताना टिम डेविड आला. त्याने फटकेबाजी केली व सर्व गणितचं बदलून टाकलं. आज पुन्हा एकदा मोक्याच्याक्षणी डेविड आऊट झाला.

पुन्हा एकदा विराट इनिंग पाहण्याची संधी

टिम डेविडने कशी मॅच फिरवली ते या व्हिडिओमधून बघा

शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर शॉ कडे त्याने सोपा झेल दिला. पण रमणदीप सिंहने त्यानंतर जबाबदारी घेत आपली भूमिका चोख बजावली. मुंबईचा मोसमातील हा चौथा विजय आहे. या विजयाने मुंबईला काही फरक पडला नाही. पण दिल्लीचं प्लेऑफमध्ये दाखल होण्याचं स्वप्न भंग पावलं. या विजयामुळे आरसीबीच्या चाहत्यांना भरपूर आनंद झाला आहे. समस्त क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा विराट कोहलीचा खेळ पाहता येईल. आरसीबी आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये एलिमिनेटरचा सामना होईल. यात पराभूत होणाऱ्या संघाचं आव्हान संपुष्टात येईल. पण विजेत्या संघाला क्वालिफायर वन आणि टू म्हणजे गुजरात आणि राजस्थानमधील विजेत्याशी खेळावं लागेल.

IPL पॉइंट्स टेबल

संघ सामने जय पराजय पॉइंट्स नेट रन रेट
गुजरात टायटन्स 14104200.316
राजस्थान रॉयल्स 1495180.298
लखनौ सुपर जायंट्स1495180.251
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर 148616-0.253
दिल्ली कॅपिटल्स 1477140.204
पंजाब किंग्स 1477140.126
कोलकाता नाइट रायडर्स1468120.146
सनरायजर्स हैदराबाद 146812-0.379
चेन्नई सुपर किंग्स 144108-0.203
मुंबई इंडियन्स144108-0.506

मुंबईकडून कोणी किती धावा केल्या?

मुंबईकडून आज इशान किशनने दमदार फलंदाजी केली. त्याने 35 चेंडूत 48 धावा फटकावल्या. रोहित शर्मा आज पुन्हा फेल ठरला. त्याला नॉर्खियाने झेलबाद केलं. ऋषभ पंतने आज डेवाल्ड ब्रेव्हिसचा सोपा झेल सोडला. ब्रेव्हिसने 37 धावा केल्या यात एक चौकार आणि तीन षटकार होते. तिलक वर्माने 21 धावा केल्या. तो ही मोक्याच्याक्षणी नॉर्खियाच्या गोलंदाजीवर बाद झाला. मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब करणाऱ्या रमणदीपने 6 चेंडूत नाबाद 13 धावा केल्या. यात दोन चौकार होते. गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स,  लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हे प्लेऑफमध्ये दाखल होणारे चार संघ आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.