MI vs KKR IPL 2022: पराभवानंतर रोहित शर्मा चिडला, प्रेझेंटेशनच्यावेळची घटना कॅमेऱ्यात कैद पहा VIDEO
MI vs KKR IPL 2022: मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये (MI vs KKR) काल सामना झाला. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानात हा सामना झाला.
पुणे: मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये (MI vs KKR) काल सामना झाला. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानात हा सामना झाला. कोलकाता नाइट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा पाच विकेट आणि 24 चेंडू राखून मोठा पराभव केला. पॅट कमिन्सरुपी (Pat Cummins) वादळात मुंबई इंडियन्स उद्धवस्त झाली. कमिन्सने 15 चेंडूत नाबाद 56 धावा फटकावल्या. डॅनियल सॅम्सच्या एकाच ओव्हरमध्ये 35 धावा चोपल्या. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सला केकेआरने कालच्या लढतीत अक्षरक्ष: धूळ चारली. मुंबई जिंकणार असं वाटत असतानाच मोठा पराभव झाला. सहाजिकच मुंबई इंडियन्ससाठी हा एक मोठा धक्का आहे. कॅप्टन रोहित शर्मा (Rohit sharma) निराश होणं, स्वाभाविक आहे. कारण संघ हरतोय, त्याचवेळी सलग तीन सामन्यात त्याच्या बॅटमधून धावा निघालेल्या नाहीत.
रोहित वैतागला
रोहित शर्माची ही निराशा, चिडचिड काल दिसून आली. एरवी रोहित शर्मा शांत-संयमी दिसतो. पण काल मॅच नंतर प्रेझेटेशनच्या कार्यक्रमात त्याची अस्वस्थतता दिसून आली. पुण्याच्या MCA स्टेडियमवर साऊंड हाताळणाऱ्या टेक्निशियनवर रोहित शर्मा चिडला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. स्टेडियमवर प्रेक्षकांचा गोंगाट असलेल्या सूत्रसंचालक काय म्हणतोय, ते रोहितला नीट ऐकू येत नव्हतं. त्याने टेक्निशियनला आवाज वाढवायला सांगितला. जेणेकरुन सूत्रसंचालक काय बोलतोय, ते समजेल. ‘आवाज वाढव यार त्याचा’ असं रोहित कॅमेऱ्यासमोर बोलला. त्यावेळी तो वैतागल्याचे भाव स्पष्टपणे त्याच्या चेहऱ्यावर होते.
मुंबई इंडियन्स कुठल्या स्थानावर?
मुंबई इंडियन्सचा संघ अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. सध्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्सचा संघ शेवटून दुसऱ्या म्हणजे नवव्या स्थानावर आहे. काल टायमल मिल्सने 14 व्या ओव्हरमध्ये अँड्रे रसेलचा विकेट काढला. त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या सामना जिंकण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. केकेआरची धावसंख्या त्यावेळी पाच बाद 101 होती.
Me at every party when my favourite song starts playing.#TATAIPL2022 #KKRHaiTaiyaar #MI @ImRo45 pic.twitter.com/mm7PUVT7XP
— Saurav Chakraborty (@saurav_MUFC_98) April 6, 2022
पाहात हा पराभव पचवणं कठीण
“काही षटकात सामना ज्या पद्धतीने बदलला, ते पाहात हा पराभव पचवणं कठीण आहे. आम्हाला अजून बरीच मेहनत करायची आहे” असं रोहितने सांगितलं. मुंबई इंडियन्सला केकेआर विरुद्धचा पराभव विसरुन रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध नव्या रणनितीसह मैदानात उतरावे लागले. RCB ने तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत.