MI vs LSG IPL 2022: SIX मारल्यानंतर स्टॉयनिसचा गर्लफ्रेंडकडे पाहून इशारा, ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिसली रोमँटिक मोमेंट

MI vs LSG IPL 2022: आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये (MI vs LSG) ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामना सुरु आहे. मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माने नाणेफेक जिंकून लखनौच्या संघाला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केलं.

MI vs LSG IPL 2022: SIX मारल्यानंतर स्टॉयनिसचा गर्लफ्रेंडकडे पाहून इशारा, ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिसली रोमँटिक मोमेंट
लखनौ सुपर जायंट्स - मार्कस स्टॉयनिस Image Credit source: Screengrab
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 7:13 PM

मुंबई: आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये (MI vs LSG) ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामना सुरु आहे. मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माने नाणेफेक जिंकून लखनौच्या संघाला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केलं. लखनौने सुरुवातही जोरदार केली. लखनौच्या फलंदाजांनी मुंबईची गोलंदाजी धोपटून काढली. लखनौने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 199 धावा केल्या. कॅप्टन केएल राहुलने शतक झळकावलं. सामन्याच्या अखेरीस फलंदाजीला आलेल्या मार्कस स्टॉयनिसने (marcus stoinis) नऊ चेंडूत केवळ 10 धावा केल्या. या खेळीत त्याने लगावलेला एक षटकार खूपच सुंदर होता. मार्कस स्टॉयनिसने छोटीशी खेळी केली. पण त्याने आपल्या फॅन्सला (fans) नाराज नाही केलं. स्टॉयनिसने मैदानावर आल्यानंतर पहिल्याच चेंडूवर शानदार षटकार ठोकला. त्याचा तो फटका पाहून फॅन्सबरोबर स्टेडियमवर उपस्थित असलेली त्याची गर्लफ्रेंडही आनंदीत झाली. स्टॉयनिसने षटकार मारल्यानंतर तिच्याकडे पाहिलं.

क्रीझवर तो राहुल सोबत बोलायला गेला

स्टॉयनिस 14 व्या षटकात फलंदाजीसाठी मैदानात आला. मनीष पांडे बोल्ड झाल्यानंतर त्याला पाठवण्यात आलं. मुरुगन अश्विनच्या षटकात पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार ठोकला. हा गुगली चेंडू होता. 104 मीटर लांब षटकार त्याने ठोकला. षटकार मारल्यानंतर क्रीझवर तो राहुल सोबत बोलायला गेला. त्यावेळी स्टॉयनिस आपल्या गर्लफ्रेंडकडे पाहून इशारा केला. असं वाटलं की हा षटकार तिच्यासाठीच होता. स्टॉयनिसची गर्लफ्रेंड सारा कजारनुकच्या चेहऱ्यावरही हास्य होते.

मागच्यावर्षी त्यांचं ब्रेकअप झालं

स्टॉयनिस मागच्यावर्षीपर्यंत स्पोर्ट्स एंकर स्टेफनी मुलरसोबत रिलेशनशिपमध्ये होता. दोघे बराच काळापासून एकत्र होते. लग्नही करणार होते. पण मागच्यावर्षी त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर स्टॉयनिस साराच्या प्रेमात पडला. दोघांनी इन्स्टाग्रामवर परस्परासोबतचे फोटो शेयर केले आहेत. दोघे ऐकमेकांना डेट करतात.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.